गोरखपुर, 13 ऑगस्ट : गोरखपुरमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाच्या मृत्यूच्या (Murder) वृत्तामुळे गावात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण रात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. रात्री तो प्रेयसीच्या घरी पोहोचला. मात्र येथे चोर समजून त्याला प्रेयसीच्या वडिलांसह स्थानिकांनी जबर मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी तरुणाची सुटका केली व त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याला इतकी मारहाण करण्यात आली होती की यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप लावला आहे. (Gorkhapur News)
पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. आणि त्यांची चौकशी सुरू आहे. मृत तरुणाचं नाव अमर सिंह गौतम असल्याचं सांगितलं जात आहे. तो पंक्चर काढण्याच्या दुकानात काम करीत होता. (Murder of a young man who came to his girlfriends house late at night )
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम यादव यांच्या घरात रात्री उशिरा घुसरलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. केवळ त्या घरातीलच नव्हते तर आजूबाजूच्या लोकांनीही त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमरच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबावर हत्येचा आरोप लावला आहे.
हे ही वाचा-माणसाने घेतला बदला; मरेपर्यंत चावत राहिला, घरी येऊन पत्नीसमोर ठेवला मृत कोब्रा
पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांनी प्राथमिक तपासाबाबत सांगितलं की, मृत तरुण अमर सिंह हा गौतम पंक्चरचं दुकान चालवित होता. यागदरम्यान परशुराम यादव यांच्या मुलीसोबत तरुणाचं प्रेम जुळलं. रात्री उशिरा अमर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. अमरला चोर समजून प्रेयसीच्या वडिलांनी त्याला मारहाण केली. त्यांनी गोंधळ केला यानंतर परिसरातील लोक जमा झाले व त्यांनीही तरुणाला मारहाण केली. पोलिसांना याबाबत कळताच ते घटनास्थळी दाखल झाले व जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केला. मात्र गंभीर जखमी झालेल्या अमरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अमरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death