मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /5 लिटर पेट्रोल घेऊन पोहोचला पत्नीच्या माहेरी; पहाटे भरझोपेत केलं धक्कादायक कृत्य

5 लिटर पेट्रोल घेऊन पोहोचला पत्नीच्या माहेरी; पहाटे भरझोपेत केलं धक्कादायक कृत्य

पहाटे तरुण पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि दार ठोठावू लागला

पहाटे तरुण पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि दार ठोठावू लागला

पहाटे तरुण पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि दार ठोठावू लागला

कानपुर, 16 जानेवारी : पत्नीला माहेराहून सासरी पाठवत नसल्याने रागाच्या भरात तरुणाने धक्कादायक पाऊल उचलल्याची बातमी समोर आली आहे. तो पत्नीला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला ते 5 लिटर गॅलनभरुन पेट्रोल घेऊनच. रागाच्या भरात त्याने धक्कादायक कृत्य केलं आहे. (He reached his wifes house with 5 liters of petrol)

सांगितलं जात आहे की, पत्नीला माहेराहून पाठवत नसल्याने तरुणाने घरात पेट्रोल ओतले व आग लावून दिली. यामध्ये पत्नीसह 8 जणं गंभीर जखमी झाले आहेत. आग लावल्यानंतर जवळपासच्या लोकांनी कसंबसं करुन घरातील लोकांना बाहेर काढलं. तोपर्यंत अनेकजण गंभीर स्वरुपात जळाले होते. यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात हलवलं आहे. (He reached his wifes house with 5 liters of petrol) या प्रकारातून सुदैवाने आरोपीचा दीड वर्षांचा मुलगा बचावला आहे.

हे ही वाचा-मद्यपी वाहनचालकाला 7 दिवसांचा कारावास; सहप्रवासीदेखील तुरूंगात

मिळालेल्या माहितीनुसार, हाता येथील निवासी हिरालाल यांनी साडे तीन वर्षांपूर्वी मोठी मुलगी मनिषा हिचं लग्न हरदोई बिलग्राम येथील इतौली गावातील ट्रक चालक मुकेश कुमार याच्यासोबत लग्न लावून दिलं होतं. पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश नशा करीत असे. यामुळे दाम्पत्यामध्ये नेहमी वाद होत होता. यानंतर मनिषा लॉकडाऊनपूर्वी माहेरी आली होती. तब्बल दीड महिन्यांनी मनिषाने एका मुलाला जन्म दिला.

मुकेशने अनेकदा मनिषाला घरी येण्यास सांगितलं, परंतु ती ऐकत नव्हती. शुक्रवारी सकाळी तब्बल 4 वाजतचा मुकेश 5 लीटर पेट्रोलने भरलेले कॅन घेऊन सासरी पोहोचला. बाहेर उभं राहून दार ठोठावलं आणि मनिषाला सोबत येण्यास सांगितलं. तिने नकार दिल्यानंतर सर्वांना जिवंत जाळण्याची धमकी दिली. यानंतर त्याने दाराला बाहेरुन कडी लावली आणि घरभर पेट्रोल टाकून लायटरने आग लावली. आग लागताच आरडा-ओरडा सुरू झाला. मुकेश आग लावून पळून गेला. परिसरातील लोकांनी आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime news, Fire