मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'आता इच्छा नाहीये...' पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या लसीकरणाला महिला डॉक्टरचा थेट नकार

'आता इच्छा नाहीये...' पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या लसीकरणाला महिला डॉक्टरचा थेट नकार

दरम्यान ‘कोरोना लस वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरु शकते’ असा इशारा नॉर्वे सरकारनं दिला आहे.

दरम्यान ‘कोरोना लस वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरु शकते’ असा इशारा नॉर्वे सरकारनं दिला आहे.

दरम्यान ‘कोरोना लस वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरु शकते’ असा इशारा नॉर्वे सरकारनं दिला आहे.

कानपुर, 16 जानेवारी : आजपासून देशभरात कोरोना लसीकरण (Corona Vaccine) सुरू झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या कहरामुळे लोकांची झोप उडाली आहे. सर्वजण कोरोना लशीच्या प्रतीक्षेत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. ( female doctor denial vaccination) मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या कोरोना लशीच्या परिणामामुळे अनेकांनी कोरोना लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारपासून कोरोना लसीकरणाचं (Covid Vaccination) अभियान सुरू झालं आहे. दरम्यान कानपूर देहात येथील (Kanpur Dehat) भोगनीपुर तहसील क्षेत्राअंतर्गत पुखराया सीएससीमध्ये एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. येथे महिला स्टाफ नर्स गीताने सीएससी परिसरात हाय वोल्टेज ड्रामा सुरू केला होता. यानंतर मात्र अतिरेकच झाला. या महिलेने सीएससीमध्ये तैनात असलेल्या महिला डॉक्टर प्रियंका यांनी लस लावून घेण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की माझी इच्छा नाही म्हणून मी कोरोना लस टोचून घेण्यास नकार दिला. ( female doctor denial vaccination)

पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारा देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 317 केंद्रांवर लसीकरण अभियानाची सुरुवातही झाली आहे. आज 31700 लोकांना कोरोनाची लस टोचली जात आहे. सर्वात आधीही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचं लसीकरण करण्यात येणार आहे. प्रदेशातील आरोग्य विभागाने याची तयारी पूर्ण केली आहे.

हे ही वाचा-Corona Vaccine : लसीकरणानंतर ‘या’ देशात 23 जणांचा मृत्यू, जगाला दिला इशारा!

यापूर्वी शुक्रवारी प्रदेशातील आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात 10 लाख 55 हजार 500 कोविशील्ड आणि 20000 कोवॅक्सीचे इंजेक्शन मिळाले आहेत. विभागाकडून पूर्णपणे तयारी सुरू केली आहे. प्रदेशातील 8 लाख 57 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक श्रेणीमधील लोकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि वॉर्ड बॉयपासून आदी

नावांचा समावेश आहे. या प्रदेशात कोल्ड चेन पूर्ण तयार करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव चिकित्सा अमित मोहन प्रसाद यांनी सांगितलं की, प्रदेशात 317 केंद्रांवर ही लस लावण्यात येईल. ( female doctor denial vaccination) प्रत्येक केंद्रावर 100-100 लोकांना लस टोचण्यात येईल. यासाठी 5-5 सदस्यांची टीम तयार करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येईल. याचा दुसरा डोज 28 दिवसांनंतर देण्यात येईल.

कोरोना लस (Corona Vaccine) दिल्यानंतर आपल्या देशातील 23 जणांचा मृत्यू झाला असा दावा युरोपातील नॉर्वे (Norway)  या देशानं केला आहे. नॉर्वेमध्ये आजवर 33 हजार जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या लसीकरणांनंतर मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. यामध्ये अनेकांचं वय हे 80 पेक्षा अधिक आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Narendra modi