रवि सपाटे( गोंदिया), 21 मार्च : गोंदिया शहराच्या रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेतील एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळला. दरम्यान तरुणाच्या गळ्यावर जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात रामनगर पोलिसांनी खुनाची नोंद केली आहे. संदीप भाऊलाल चिखलोंडे (29), रा. चांदणीटोला (नागरी), ता. जि. गोंदिया असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Instagram साठी व्हिडिओ बनवायला गेले अन् परतलेच नाही, तलावात चौघांसोबत घडलं भयानक
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालय हिवराजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेत संदीप चिखलोंडे याचा मृतदेह झाडाला लटकलेला स्थितित दूध घेऊन जाणाऱ्या लोकांना आढळला. एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती उमेश ओमकार माहुले, रा. हिवरा याने पोलिस पाटील विनोद नंदेश्वर यांना दिली.
नंदेश्वर यांनी जाऊन खात्री केली असता वन विभागाच्या मोकळ्या जागेत एका झाडाला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संदीप चिखलोंडे याच्या मानेवर धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करण्यात आला।. त्यानंतर त्याच्या गळ्याला गमछा, मफ- लरसारख्या कपड्याने बांधून झाडाला लटकविले.
त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागोजागी रक्ताचा सड़ा पडला होता. संदीपचा खून करणारे ओळखीचेच असावेत असा कयास लावला जात आहे. यासाठी रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे प्रत्येकी एक अशा दोन चमू गठित करून आरोपींच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. आरोपी सापडल्यानंतरच या खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Murder, Murder news, Suicide news