मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवऱ्याच्या आतेभावावर आला जीव, विवाहित असून त्यानेही साधली संधी, प्रियकराच्या मदतीने पतीसोबत केलं कांड

नवऱ्याच्या आतेभावावर आला जीव, विवाहित असून त्यानेही साधली संधी, प्रियकराच्या मदतीने पतीसोबत केलं कांड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पत्नीने आपल्या पतीसोबत विश्वासघात करत त्याच्यासोबत धक्कादायक कांड केले.

  • Local18
  • Last Updated :
  • Munger, India

अरुण कुमार शर्मा, प्रतिनिधी

मुंगेर, 20 मार्च : जिने एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती आणि सात वचने पूर्ण करण्यासाठी सात फेरेही घेतले होते, त्याच पत्नीने पतीसोबत धक्कादायक कृत्य केले. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. या हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथील ईस्ट कॉलनी पोलिस स्टेशन परिसरात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

रेल्वे कर्मचारी जितेंद्र कुमार याची पत्नी ममता आणि तिचा प्रियकर अजित कुमार उर्फ ​​छोटू, (रा. ईस्ट कॉलनी पोलीस स्टेशन हद्द, रेल क्वार्टर 2-एबी केंट रोड) याने एकत्रितपणे निर्घृण हत्या केली. हा प्रकार मृताच्या वडिलांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तातडीने कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळ गाठून ममता आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

पतीची हत्या केली -

जितेंद्रचे लखीसराय जिल्ह्यातील अभयपूर येथील रहिवासी असलेल्या ममता देवीसोबत 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून जितेंद्रला ममताची वागणूक आवडली नाही. तिने त्याने अनेकदा विरोध केला. दरम्यान, ममता जितेंद्रचा आतेभाऊ अजित कुमार उर्फ ​​छोटू याच्या प्रेमात पडली. मग यानंतर दोघेही गुपचूप भेटू लागले आणि रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. या सर्व प्रकाराला जितेंद्रने विरोध केला.

जितेंद्रचा चुलत भाऊ अजित हा देखील विवाहित आहे आणि एका मुलाचा बाप आहे आणि दिल्लीत काम करतो. दरम्यान, अजित काल रात्री उशिरा दिल्लीहून परतला आणि सकाळी जितेंद्रच्या घरी पोहोचला. यावरून जितेंद्र आणि अजित यांच्यात वाद झाला. या वादाचा फायदा घेत ममता हिने प्रियकर अजितसोबत मिळून जितेंद्रच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात जितेंद्रच्या डोक्याला अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Instagram साठी व्हिडिओ बनवायला गेले अन् परतलेच नाही, तलावात चौघांसोबत घडलं भयानक

सकाळी मुलासोबत काही घटना घडल्याचा फोन आल्यावर वडिलांना मुलाच्या हत्येची माहिती मिळाली. ते त्यांच्या मुलाच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचा मुलगा घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून तपास केला असता, मृताच्या चार वर्षांच्या मुलाने वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मृताची पत्नी ममता आणि तिचा प्रियकर अजित यांना अटक केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवला.

मृताचे वडील योगेंद्र राम यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे मोठ्या गरिबीत पालनपोषण केले आणि आज त्यांच्या सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या मुलाची हत्या केली. मृताच्या तीन वर्षांच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime news, Local18, Physical Relationship, Women extramarital affair