आशीष कुमार शर्मा (दौसा) 17 मार्च : शेजार धर्माला लाजवेल अशी एक घटना राजस्थानमधील दौसा येथे घडली आहे. बसवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 24 वर्षीय तरुणी तिच्या घरी आंघोळ करत असताना शेजारच्या तरुणाने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर तरुणी त्याला एकटी भेटल्यावर तरुणाने तिला व्हिडिओ दाखवला आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.
इज्जतीच्या भीतीने पीडितेने त्याला ती शरण गेली. याचा फायदा घेत आरोपीची हिंमत एवढी वाढली की, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले. अशा स्थितीत वारंवार ब्लॅकमेल करून आरोपीने पीडितेवर अनेकवेळा बलात्कार केला.
बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात पोहोचला विवाहित, म्हणाला प्रेयसीसोबत लग्न करायचंय… बाबाने काढली “पर्ची” अन्…बराच काळ ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराच्या त्रासाला कंटाळून मुलीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर बसवा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पीडितेचे मेडिकलही करण्यात आले आहे.
विधवा शिक्षिकेवर मुख्याध्यापकाची वाईट नजर, शारिरीक संबंधांसाठी दबाव, विद्येच्या मंदिरात संतापजनक घटनाया घटनेची माहिती आरोपीच्या नातेवाईकांना दिल्यावर त्यांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध मारहाणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.