नवी दिल्ली 22 डिसेंबर : एक हैराण करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका प्रेयसीने बॉयफ्रेंड (Boyfriend) सतत बोलत असल्याने त्याच्यासोबत जे काही केलं ते जाणून तुमचाही थरकाप उडेल. बॉयफ्रेंडनेही हा विचार केला नसेल की आपलं जास्त बोलणं आपल्यासाठी इतकं घातक ठरेल. ही घटना अमेरिकेतील (America) आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं चिमुकल्याचा घोटला गळा; अनैतिक संबंधातून काढला काटा इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारी एल्विस पॅरिश नावाच्या महिलेनं पोलिसांसमोर मान्य केलं की तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या ड्रिंकमध्ये विष मिसळवलं (Girlfriend Poisoned her Boyfriend). महिलेनं सांगितलं की तिचा बॉयफ्रेंड सतत बोलत होता आणि शांतच बसत नव्हता. यामुळे 54 वर्षाच्या पॅरिशने आपला 61 वर्षाचा बॉयफ्रेंड विलियम कार्टर याच्या ड्रिंकमध्ये विष टाकून दिलं. बॉयफ्रेंडला विष दिल्यानंतर महिलेनं स्वतःच पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. महिलेनं सांगितलं की तिने आपल्या बॉयफ्रेंडला लेमनेड ड्रिंकमध्ये मिसळून विष दिलं. महिलेनं म्हटलं की जर तिने त्यावेळी आपल्या बॉयफ्रेंडला विष दिलं नसतं तर तो अशीच बडबड करत राहिला असता. महिलेनं सांगितलं की बॉयफ्रेंडच्या खूप बोलण्याच्या सवयीमुळे ती वैतागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या बॉयफ्रेंडला विष दिल्यानंतर महिलेनं पाहिलं की त्याच्यावर या विषाचा परिणाम होऊ लागला आहे आणि त्याची प्रकृती खराब होत आहे. यानंतर तिने घाबरून पोलिसांना फोन केला. यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलीस तिथे गेले तेव्हा महिलेचा बॉयफ्रेंड तडफडत होता. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याचा जीव वाचला. मित्रांनीच दिली नराधमला साथ, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडित बॉयफ्रेंडने सांगितलं की लेमनेड ड्रिंक पिताच त्याला अजब वाटू लागलं. मात्र त्याने कधीही विचार केला नव्हता की आपली गर्लफ्रेंडच आपल्याला विष देईल. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेंडला ताब्यात घेत तुरुंगात तिची रवानगी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.