मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दोन भावांना मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, समोरून रेल्वे आली अन्… 

दोन भावांना मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, समोरून रेल्वे आली अन्… 

हरियाणाच्या पानिपतमध्ये मनाना गावच्या वेशीजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या धडकेने दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणाच्या पानिपतमध्ये मनाना गावच्या वेशीजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या धडकेने दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणाच्या पानिपतमध्ये मनाना गावच्या वेशीजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या धडकेने दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Haryana, India

पानिपत (सुमित कुमार), 02 एप्रिल : हरियाणाच्या पानिपतमध्ये मनाना गावच्या वेशीजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या धडकेने दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा हा अपघात घडल्यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. वाढदिवसाची पार्टी करून ते घरी परत येत असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय श्यामलाल आणि 19 वर्षीय सागर हे दोघेही पानिपतच्या समलखामधील भारत नगरचे रहिवासी होते. दोघेही चुलत भाऊ होते.

 

मागच्या दोन दिवसांपूर्वी ते संध्याकाळी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. मात्र यादोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दोघेही घरी परत न आल्याने घरच्यांनी तपास सुरू करताच याबाबत माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मनाना फाट्याजवळ रेल्वे अपघात झाला असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी तेथे जाऊन पाहिले असता तर घरच्यांना याबाबत धक्काच बसला. अपघातामुळे दोघांच्या मृतदेहाचे तुकडे झाले होते. मोठा भाऊ श्यामलाल हा दोन मुलींचा बाप असून सागरच्या लग्नाची नुकतीच चर्चा सुरू होती.

सरपंच प्रवीण गोपाळे हत्याकांडात मोठी अपडेट समोर; हल्लेखोरांनी आधी रेकी केली अन् नंतर 25 सेकंदात..

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघेही अपघाताचे बळी ठरले की आणखी काही कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत घरातील सदस्यांनाही माहिती नाही. हे दोघे कोणत्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते.

First published:
top videos

    Tags: Haryana, Local18, Railway accident