श्रीगंगानगर, 19 सप्टेंबर : प्रेमात कधी कुणावर जीव येईल, हे सांगता येत नाही. तसेच प्रेमात माणूस आंधळा असतो, असेही म्हटले जाते, अशीच एक घटना समोर आली आहे. यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रियकर आधीच विवाहित असून प्रेयसी अल्पवयीन आहे. मात्र, लग्न करायची इतकी तीव्रता झाली की, ते यासाठी जीव द्यायलाही तयार झालेत. लग्नाच्या हट्टामुळे अल्पवयीन प्रेयसीने टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्या प्रेमात वेडा झालेला विवाहित तरुण विजेच्या टॉवरवर चढला. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथील आहे. याठिकाणी रविवारी प्रेयसीसोबत लग्न करण्याची मागणी करत वीरुगिरी करण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हनुमान खेजाडी मंदिराजवळील टॉवरवर एक तरुण चढला. अल्ताफ असे या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. तो सुरतगडच्या वॉर्ड क्रमांक 6 चा रहिवासी आहे. अल्ताफ टॉवरवर चढल्यानंतर तेथे लोक जमा झाले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तरुणाची समजूत घालून अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बोलावली. यादरम्यान तरुणाचा मित्र टॉवरवर चढला आणि त्याने तरुणाला त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलायला लावलं. यावेळी प्रेयसीने केलेल्या आवाहनावर तरुण भावूक झाला. नंतर तो टॉवरवरून खाली आला. त्यानंतर पोलिसांनी आणि तरुणाच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर शहर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी उपस्थित लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. हेही वाचा - 44 वर्षांची काकी अन् 14 वर्षांचा पुतणा एकाच खोलीत, तेवढ्यात काका आला; नंतर भयंकर कांड एक दिवसापूर्वी प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर - दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधी तरुणाच्या प्रेयसीनेही प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करत टॉयलेट क्लीनर प्यायली होती. ही माहिती मिळताच तिचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. त्याचवेळी त्याच्या प्रेयसीचे नातेवाईकही मुलीला समजावण्यात मग्न आहेत. ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.