मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

44 वर्षांची काकी अन् 14 वर्षांचा पुतणा एकाच खोलीत, तेवढ्यात काका आला; नंतर भयंकर कांड

44 वर्षांची काकी अन् 14 वर्षांचा पुतणा एकाच खोलीत, तेवढ्यात काका आला; नंतर भयंकर कांड

काका खोलीत शिरला, त्यानंतर असं काही घडलं की, कोणी विचारही करू शकणार नाही.

काका खोलीत शिरला, त्यानंतर असं काही घडलं की, कोणी विचारही करू शकणार नाही.

काका खोलीत शिरला, त्यानंतर असं काही घडलं की, कोणी विचारही करू शकणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 18 सप्टेंबर : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून एक अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे ४४ वर्षांची काकी आणि १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचं लग्न लावून देण्यात आलं. महिलेच्या पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचं लग्न लावून दिलं. महिलेला तीन मुलंही आहेत. ही घटना १२ सप्टेंबरची असून आता प्रकाशात आली आहे. नात्याला काळिमा फासणारी ही घटना वनमनखी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकी आणि १४ वर्षीय पुतणा आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते. ज्यानंतर पतीने जबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. यादरम्यान अनेक गावकरी हजर होते. हे लग्न संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरलं आहे.

पंजाबमध्ये काम करतो महिलेचा पती...

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती पंजाबमध्ये काम करतो. त्याची पत्नी आणि पुतण्यामध्ये अवैध संबंध असल्याची माहिती गावकऱ्यांनी महिलेच्या पतीला दिली होती. ज्यानंतर एके दिवशी गुपचूप पती गावी आला. यावेळी १४ वर्षांचा पुतणा आणि पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने दोघांंचं लग्न लावून देण्यात आलं. अल्पवयीन मुलाने आपल्या काकीसोबत लग्न केलं. लग्नाचे सर्व विधी करण्यात आले. दोघांमधील अवैध संबंधाबाबत गावकऱ्यांना आधीच माहिती होती. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती होती.

हॉस्टेलमधील तरुणींचे अंघोळ करतानाचे Video लिक! तरुणाच्या सांगण्यावरुन तरुणी.. इनसाइड स्टोरी

गावकऱ्यांच्या दबावामुळे अल्पवयीन मुलाचं कुटुंबीय थांबले...

पतीने जेव्हा पत्नी आणि पुतण्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. यानंतर त्याच्या घराजवळ गावकऱ्यांनी गर्दी केली. गावकऱ्यांनी महिलेच्या पतीवर दोघांचं लग्न लावून देण्यासाठी जबरदस्ती केली. यानंतर गावातच दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. यादरम्यान गावकऱ्यांकडे काठ्या होत्या. गावकऱ्यांच्या भीतीने महिलेने पुतण्यासोबत लग्न केलं. यादरम्यान अल्पवयीन मुलाचं कुटुंबीयही हजर होतं. मात्र गावकऱ्यांच्या भीतीने कोणीच या लग्नाला विरोध करू शकलं नाही. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेच्या पतीसह अन्य गावकऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Marriage