बडोदा, 3 ऑक्टोबर : नवरात्रीच्या अवघ्या दोन रात्री शिल्लक आहे. त्यामुळे हे दोन दिवस मनसोक्त गरबा खेळला जात आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही मोठ्या संख्येने गरबा खेळला जातो. दरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गरबा खेळत असताना तरुणीचं एक धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. राज्यभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक गरब्याच्या रंगात रंगले आहेत. त्यानंतर बडोद्यातील युनायटेडवे पुन्हा वादात सापडला आहे. युनायटेडवे गरबा जगभरात ओळखला जातो. तिथल्या नवरात्रीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक मुलगी तोंडातून धूर काढताना दिसत आहे.
યુનાઇટેડ વેમાં ગરબા રમતાં રમતાં યુવતીએ કર્યું સ્મોકિંગ pic.twitter.com/1HdtO9ZHF3
— News18Gujarati (@News18Guj) October 3, 2022
हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांचा रोष समोर आला आहे. गरबा खेळताना तिने ई-सिगारेट ओढल्याची चर्चा आहे. नवरात्रीच्या सुरुवातीलाच बडोद्यातील प्रसिद्ध युनायटेडवे मैदानावर दगडफेकीमुळे वाद निर्माण झाला होता. ते प्रकरण शांत झाल्यावर नवा वाद निर्माण झाला आहे. राहिले केवळ 3 दिवस; असा मेकअप केला तर गरब्यात तुमचीच होईल चर्चा, लगेच हा Video पाहा गरबा खेळताना मुलीचा धूर उडवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गरबा आयोजक आणि तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र न्यूज18 लोकमत या व्हिडिओची पुष्टी करीत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या तरुणीवर कारवाई करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.