बलात्कार केलेल्या आरोपीच्या घरी बँड-बाजासह पोहचले पोलीस, Video Viral

बलात्कार केलेल्या आरोपीच्या घरी बँड-बाजासह पोहचले पोलीस, Video Viral

अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape) केल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीच्या घरी पोलीस चक्क बँड-बाजा घेऊन दाखल झाले होते.

  • Share this:

वैशाली (बिहार), 10 एप्रिल : अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape) केल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या व्यक्तीच्या घरी पोलीस चक्क बँड-बाजा घेऊन दाखल झाले होते. पोलिसांनी या आरोपीच्या घरावर नोटीस लावली. त्याचबरोबर माईकवरुन सर्व गावकऱ्यांना त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. या आरोपीला लवकरात लवकर आत्मसमर्पण करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.बिहारमधील (Bihar) वैशाली जिल्ह्यातील हा प्रकार आहे. बिहार पोलिसांचा (Bihar Police) हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

वैशाली जिल्ह्यातील महुआ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा प्रकार आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव अभिषेक कुमार असून  तो बराच काळापासून फरार आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस त्याच्या घरावर नोटीस लावण्यासाीठी गेले होते. ही कारवाई करण्यापूर्वी पोलिसाींनी बँड लावून गावकऱ्यांना अभिषेकनं केलेल्या गुन्ह्याची माहिती सर्वांना दिली.

पोलिसांच्या या अनोख्या कृतीनं गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं असलं तरी ते खूश आहेत. अभिषेक कुमारला अटक करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. अभिषेकच्या कृतीमुळे गावचं नाव खराब झाल्याचा त्यांचा दावा आहे.

'पोलिसांच्या या कारवाईनंतर आरोपीला अटक झाली तर आम्हाला न्याय मिळेल,' अशी भावना पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी न्यूज 18 शी बोलताना व्यक्त केली आहे.

3.5 कोटींच्या विम्यासाठी 62 वर्षांच्या पतीला पत्नीनं जिवंत जाळलं! )

अभिषेकवर अल्पवयीन मुलीला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीनं अश्लील व्हिडीओ देखील बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची त्यानं पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी दिली होती. या प्रकरणात कुटुंबीयांनी अभिषेकच्या विरोधात महुआ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तो फरार झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 10, 2021, 4:12 PM IST

ताज्या बातम्या