जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / कबड्डी स्पर्धेदरम्यान युवकासोबत धक्कादायक प्रकार, अमरावतीमधील प्रकाराने खळबळ

कबड्डी स्पर्धेदरम्यान युवकासोबत धक्कादायक प्रकार, अमरावतीमधील प्रकाराने खळबळ

कबड्डी स्पर्धेदरम्यान युवकासोबत धक्कादायक प्रकार, अमरावतीमधील प्रकाराने खळबळ

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 17 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही गुन्ह्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिवसा शहरात एका युवकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण घटना - अमरावतीच्या तिवसा शहरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तिवसा शहरातील यादव देशमुख महाविद्यालयात ही कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या कब्बड्डी स्पर्धेदरम्यान आज सायकांळी 7:20 वाजताच्या सुमारास एका युवकच्या मानेवर ब्लेडने हल्ला करण्यात आला. नितीन सर्कल पवार, असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या मानेवर ब्लेडने वार करत हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: amravati
  • First Published :
जाहिरात
जाहिरात