बूंदी, 12 मार्च : राज्यातच नव्हे तर देशात विवाहबाह्य संबंधाच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच मुलाच्या पत्नीसह फरार झालेल्या आशिक मिजाज सासऱ्याचा अद्यापही कोणताही सुगावा लागलेला नाही. आपल्या सुनेवर अतोनात प्रेम करणारा हा सासरा महिनाभरापूर्वी तिला घेऊन पळून गेला होता. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील आहे. वडिलांच्या या कृत्याने हादरलेल्या मुलाने पत्नीला शोधण्याची विनंती करत पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, अद्यापपर्यंत दोघांचाही सुगावा लागलेला नाही. दोघांचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिलोर गावात राहणारा रमेश वैरागी हा त्याचाच मुलगा पवन वैरागी याच्या पत्नीसह फरार झाला आहे. पवन वैरागी यांची मुलगी सहा महिन्यांची आहे. पीडित तरुण पवन वैरागी याचे म्हणणे आहे की, त्याचे वडील रमेश वैरागी त्याच्या पत्नीला घरातून घेऊन गेले. त्याची पत्नी खूप साध्या स्वभावाची आहे. असे म्हणत पत्नीच्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊन वडिलांनी तिला पळवून नेल्याचा आरोप पवनने केला आहे. “..म्हणे मी दिसायला सुंदर नाही”, 25 वर्षांच्या डॉक्टर तरुणीचा भयानक निर्णय मुलाच्या गैरहजेरीचा घेतला फायदा - पवनने सांगितले की, त्याचे वडील आधीही त्याच्या पत्नीसोबत अश्लिल वर्तन करायचे. तसेच तो तिला धमक्याही देत असे. नंतर वडील आपल्या सुनेला दुचाकीवरून घेऊन पळून गेले. पवन मजूर म्हणून काम करतो आणि कामानिमित्त तो बाहेर राहतो. मात्र, त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या वडिलांनी पवनच्या पत्नीला पळवून नेले. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. सध्या संपूर्ण देशात विवाहबाह्य संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. तसेच यातून हत्या आणि आत्महत्येच्याही भयानक घटना घडत आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.