तरुणीनं होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; समोर आलं धक्कादायक कारण

तरुणीनं होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; समोर आलं धक्कादायक कारण

तरुणीनं आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्यानं आत्महत्या (Girl Committed Suicide) केली आहे. इतकंच नाही तर ज्यावेळी तिनं गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत (Fiance) व्हिडिओ कॉलवर (Video Call) बोलत होती.

  • Share this:

लखनऊ 25 जून: एक अत्यंत हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. यात एका तरुणीनं आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्यानं आत्महत्या (Girl Committed Suicide) केली असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर ज्यावेळी तिनं गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत (Fiancé) व्हिडिओ कॉलवर (Video Call) बोलत होती. आपल्या होणाऱ्या पत्नीला आत्महत्या करताना या युवकानं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहिलं. यानंतर त्यानं पोलीस आणि घरच्यांना याबाबतची माहिती दिली. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवांच्या महुआपार गावातील आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तरुणीनं आत्महत्येचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या होणाऱ्या पतीला चौकशीसाठी बोलावलं आहे. महुआपारमधील रहिवासी लालचंद यांनी आपली मुलगी कुमारी पूजा हिचं लग्न संतकबीरनगर जिल्ह्यातील युवकासोबत ठरलं होतं. 29 मे रोजी हे लग्न होणार होतं. मात्र, काही कारणांमुळे हे लग्न मोडलं.

इंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं

यादरम्यान पुजाचं आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोनच्या माध्यमातून बोलणं होत होतं. युवक नोएडामध्ये नोकरी करतो. मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितलं, की तिच्या मृत्यूची माहिती नोएडामधून तिच्या होणाऱ्या पतीनं आधी दिली. जेव्हा मी तिच्या रुमकडे गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं गेलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

कुटुंबातील सदस्यांनी अद्याप याबाबत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की हे प्रकरण पाहता असं वाटतं, की तरुणीनं कुठल्या तरी गोष्टीमुळे नाराज असल्यानं लाईव्ह सुसाईड केली आहे. याच कारणामुळे तिच्या होणाऱ्या पतीला या गोष्टीची माहिती आधी मिळाली. पोलिसांनी म्हटलं, की याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Published by: Kiran Pharate
First published: June 25, 2021, 9:12 AM IST

ताज्या बातम्या