Home /News /maharashtra /

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडून विधवा शिक्षिकेचा छळ; शरीरसुखाची केली मागणी

Crime in Satara: सातारा (satara) पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यानं एका विधवा शिक्षिकेचा (Widow teacher) मानसिक आणि शारीरिक छळ (Sexual harassment) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता.

पुढे वाचा ...
    सातारा, 25 जून: सातारा (satara) पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यानं एका विधवा शिक्षिकेचा (Widow teacher) मानसिक आणि शारीरिक छळ (Sexual harassment) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिका शाळेत रुजू झाल्यापासून आरोपी गटशिक्षणाधिकारी तिच्या मागावर होता. आरोपीनं पीडितेवर अनेकदा अश्लील शेरेबाजी केली आहे. सोबतच पीडितेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी देखील (Demand sexual relation) केली आहे. याप्रकरणी पीडितेनं आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे. या संतापजनक घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशाखा समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पीडित महिला सातारा तालुक्यातील एका शाळेत उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे. या शिक्षिकेनं आयुक्‍तांना एक लेखी निवेदन दिलं असून त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेत रुजू झाल्यापासून गटशिक्षणाधिकार्‍यानं त्रास द्यायला सुरू केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर आरोपी गटशिक्षणाधिकाऱ्यानं पंचायत समितीमध्ये बोलावून कौटुंबीक पार्श्‍वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय पीडित शिक्षिकेच्या पतीचं निधन झालेलं असतानाही तुमचे मिस्टर कुठे असतात, तुमची बदली करू का, कोंढवलीला जाता का? चिंचणेरला येता का? असे विविध प्रश्‍न विचारून गटशिक्षणाधिकार्‍यांनी मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. 31 जानेवारी 2020 रोजी मुख्याध्यापक कामानिमित्त बाहेर गेले असता, दुपारी आरोपीनं अचानक शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांची चौकशी करायची सोडून पीडितेवर अश्लील शेरेबाजी केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. हेही वाचा-सातारा: अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून बलात्कार;गर्भवती राहिल्यानंतर अत्याचार उघड पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी गटशिक्षणाधिकारी 10 आणि 17 जून 2020 रोजी दोन वेळा पीडितेच्या घरी आले. दरम्यान घरात खेळणाऱ्या पीडितेच्या मुलीला घराबाहेर पाठवून शरीरसुखाची मागणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कोरोना काळात वर्गातील मुलांची तपासणी घेवून शैक्षणिक कामाबाबत नाचक्की करण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच पीडितेबाबत शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार अर्जही केल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Satara, Sexual harassment

    पुढील बातम्या