Home /News /crime /

बोटीचं भाडं मागितल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणाची हत्या, केवळ 10 रुपयांसाठी नराधमांनी घातल्या गोळ्या

बोटीचं भाडं मागितल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणाची हत्या, केवळ 10 रुपयांसाठी नराधमांनी घातल्या गोळ्या

आपल्या बोटीतून (boat) प्रवास करणाऱ्या तरुणांकडे भाड्याचे 10 रुपये (Rs. 10 fare) मागणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा (minor boy) त्या गुंड तरुणांनी (goons) खून (murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे.

    पटना, 23 ऑगस्ट : आपल्या बोटीतून (boat) प्रवास करणाऱ्या तरुणांकडे भाड्याचे 10 रुपये (Rs. 10 fare) मागणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा (minor boy) त्या गुंड तरुणांनी (goons) खून (murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. गावाला पुराचा वेढा पडला असल्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी हा मुलगा बोट चालवत होता. नागरिकांना गावात येण्यासाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी या बोटीचा उपयोग होत होता. मात्र काही अज्ञात गुंडांचा बोटीच्या भाड्यावरून अल्पवयीन तरुणाशी वाद झाला. गावाला पुराचा वेढा बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील बनभोरा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुले गावात येण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे 17 वर्षांचा एक मुलगा नागरिकांच्या सोयीसाठी बोट चालवत होता. बोटीनं प्रवास करण्याचे प्रत्येकाकडून तो 10 रुपये भाडे घेत असे. रविवारी या बोटीत काही अज्ञात गुंड बसले. बोट किनाऱ्याला लागल्यानंतर प्रत्येकाने भाड्याचे 10 रुपये दिले, मात्र या गुंडांनी पैसे द्यायला नकार दिला. तरुणाने पैशांची मागणी केल्यानंतर या तरुणांनी पैसे देण्यास नकार दिला आणि तरुणाला शिविगाळ करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी वाचवले या गुंडांची आणि तरुणाची शाब्दिक चकमक वाढत गेली आणि हाणामारीला सुरुवात झाली. गावातील लोकांनी वेळीच पुढाकार घेत त्यांचं भांडण सोडवलं आणि चार गुंडांना तिथून पिटाळून लावलं. दुसऱ्या दिवशी हे गुंड गावात शिरले आणि त्यांनी या तरुणाला त्याच्या घरासमोरच गोळ्या घातल्या. ग्रामस्थांच्या देखत, कुटुंबीयांच्या देखत तरुणाला गोळ्या घालण्यात आल्या. हे वाचा -घरातून येत होती दुर्गेंधी, पोलिसांनी दार उघडून पाहिले आणि... या घटनेची कल्पना ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. मात्र गावाला पाण्याचा वेढा पडल्यामुळे पोलिसांना तिथे पोहोचायला उशीर झाला. तरुणाला वर्मी गोळ्या लागल्यामुळे जागीच तरुणाचा मृत्यू झाला. आपल्या तरुणाचे कुणाचीही वितुष्ट नसल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आपला मुलगा अत्यंत थंड डोक्याचा होता, त्याचे कुणाशीही भांडण होत नसे, असं त्याच्या कुटुंबाच म्हणणं आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सामान्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Murder

    पुढील बातम्या