300 गाड्यांचा ताफा, तळोजा ते पुणे कुख्यात गुंडाची जंगी मिरवणूक

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेचीथेट तळोजा करागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेचीथेट तळोजा करागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

  • Share this:
 पुणे, 16 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाबाहेर (pune yerwada jail) फटाके फोडून एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला होता. आता त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची (gajanan marne) थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही जवळपास 300 चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी पंधरा दिवसात अमोल बधे, पप्पू गावडे आणि एकाचा खून करून मारणे टोळीने दहशतीचा नवा अध्याय शहरात सुरू केला होता.  सलग झालेल्या खूनानंतर शहरात टोळी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी मारणे टोळीवर मोक्का कायद्याने कारवाई करत जवळपास तीन वर्ष गजानन मारणे याला कारागृहात जेरबंद करून ठेवलं होतं. मात्र, दहशतीच्या जोरावर सीसीटीव्ही सारखे पुरावे असताना ही पुणे शहराच्या मधावर्ती भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलीस टिकवू शकले नाहीत आणि या सगळ्या गुन्ह्यातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाली. आता कारागृहातून सुटताना पुन्हा गजा मारणेने दहशतीची झलक दाखवली आणि गजाच्या समर्थकांनी मुंबई आणि पुणे जिल्हा ग्रामीण आणि शहराच्या पोलिसांना आव्हान देत तब्बल 300 पेक्षा जास्त चार चाकी गाड्या घेऊन सव्वाशे किलोमीटर मिरवणूक काढली. त्याचे समर्थक गजा  पुण्याचा किंग असल्याचे शहरात रॉयल एन्ट्री असे व्हिडीओ स्टेटस ठेऊन सोशल मीडियावर दहशत पसरवत असल्याचं समोर आलंय आणि दुर्दैव म्हणजे राज्याचं पोलीस खात याला कुठलीही आडकाठी करू शकलं नाही. पंधरा दिवसांपूर्वीच शहरातला मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ याची कतील सिद्दिकीच्या खुनातून मुक्तता झाल्यानंतर अशीच मोहोळ टोळीने अशीच' हवा ' केली होती आणि पुणे पोलीस त्याच काहीच करू शकले नाहीत. आता गजा मारणे ही कारागृहातून बाहेर आल्यानंतर तशीच हवा करण्यात आली आणि पोलीस पुन्हा पहात राहिले. दिवसाढवळ्या केलेल्या खुनानंतर ही कायद्याच्या कचाट्यातून सुटून राजरोस एखाद्या सेलिब्रिटींच्या थाटात वावरणाऱ्या या कुख्यात गुन्हेगारांनी पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे. किमान आता तरी पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये येतील अशी अपेक्षा. नाहीतर शहर पुन्हा एकदा टोळी युध्दाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं आहेच.
Published by:sachin Salve
First published: