मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /जंगलात गँग रेप करून खून! गुन्हा लपवण्यासाठी जे केलं ते भयानक, पोलीसही हादरले

जंगलात गँग रेप करून खून! गुन्हा लपवण्यासाठी जे केलं ते भयानक, पोलीसही हादरले

डेहराडून पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मागच्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या गँगरेप आणि हत्येचा आरोपी असलेल्या जयकरणला अटक केली आहे.

डेहराडून पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मागच्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या गँगरेप आणि हत्येचा आरोपी असलेल्या जयकरणला अटक केली आहे.

डेहराडून पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मागच्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या गँगरेप आणि हत्येचा आरोपी असलेल्या जयकरणला अटक केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttarakhand (Uttaranchal), India

सतेंद्र बारटवाल (डेहराडून), 01 एप्रिल : डेहराडून पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मागच्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या गँगरेप आणि हत्येचा आरोपी असलेल्या जयकरणला अटक केली आहे. 2017 मध्ये मसुरी येथील चुनाखळा जंगलात आरोपीने आठ साथीदारांसह एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर गुन्हा लपविण्यासाठी पीडितेची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी जयकरणचे सर्व साथीदार यापूर्वीच पकडले गेले आहेत, मात्र तो बराच काळ फरार होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2017 मध्ये मसुरीपासून सुमारे दोन किलोमीटर असलेल्या चुनाखला जंगलात एका महिलेला लटकवून जाळलेल्या अवस्थेत सोडण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने आवश्यक पुरावे गोळा करत असतानाच महिलेच्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. पुरोला उत्तरकाशी येथील असे मृत तरुणीचे नाव होते. तपासादरम्यान असे आढळून आले की, आधी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी मृताच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले होते.

दारुड्या बापाने शिवीगाळ केली, 22 वर्षीय तरुणीला राग झाला अनावर, घेतला भयानक निर्णय

याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. कारवाई करताना पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून कारागृहात पाठवले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी जयकरण हा बिहारमधील सीतामढी येथील रहिवासी आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता. उत्तराखंड पोलिसांनी अथक परिश्रमानंतर त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

नवज्योतसिंग सिद्धु यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशी? कैद्यांना शिक्षेत सूट कशी मिळते? जाणून घ्या

यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या अटकेसाठी सतत छापे टाकले जात होते, मात्र आरोपी जयकरण हा तिथून फरार होता. जेव्हा जेव्हा पोलिस आरोपींना पकडण्यासाठी जात होते तेव्हा नेपाळ आणि बिहार सीमेचा फायदा घेऊन आरोपी नेपाळला पळून जात होते. पण, गुप्तचरांच्या माहितीवरून आरोपी जयकरणला डेहराडूनच्या ISBT परिसरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी तो डेहराडूनला आला होता.

First published:
top videos

    Tags: Local18, Uttarakhad