जितेंद्र जाधव, प्रतिनिधी पुणे, 22 ऑगस्ट : राज्यात काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. पुण्यातही या प्रकारच्या घटना घडत आहेत. आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. राहुल हनुमंत जाधव असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पीडित मुलीला बळजबरीने मक्याच्या शेतात ओढून नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शनिवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला आहे. तिघांविरोधात भादवि 376सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राहुल हनुमंत जाधव या मुख्य आरोपीस वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दोघे अद्याप फरार आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत राहुल हनुमंत जाधव याने पीडितेला शेतात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने ओमिनी या चारचाकीमधून आलेल्या त्याच्या दोघा साथीदारांपैकी एकानेसुद्धा पीडितेवर जबरदस्ती केली. या दोघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. यानंतर आरोपींनी पीडितेस ओमिनी गाडीतून इंदापूर बारामती रोडवर असलेल्या एका घरात घेऊन गेले. थोड्यावेळाने त्याच गाडीतून आरोपींनी तिला बेलवाडी बस स्थानकावर सोडले. या तिघा नराधमांपैकी मुख्य आरोपी असलेल्या राहुल हनुमंत जाधव याला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - पुण्यातील धक्कादायक प्रकार, मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली साताऱ्यात जादूटोणा करून विवाहित महिलेवर बलात्कार साताऱ्यात जादूटोणा करून विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कौटुंबिक अडचणी दुर करण्याच्या बहाण्याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करण्यात आले. यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी साताऱ्यातील मुक्तार नासीर शेख या भोंदूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी भोंदू शेखला ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.