पुणे, 22 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुण्यातही मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातून अत्याचार, आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आता पुण्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाने आपल्या पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. तसेच वेळोवेळी मारहाण करून तिच्याकडून तब्बल 1 ते 2 कोटींची रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या मांत्रिकाने सर्वांसमोर अंघोळ करायला लावली, त्याच्यावरही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने पतीसह सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये फिर्यादीचा पती, सासरा आणि सासू यांचा समावेश आहे. या तिघांनी फिर्यादी महिलेवर अत्याचार केले. तसेच या सासरच्यांकडून वेळोवेळी फिर्यादीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. बनावट स्वाक्षरीने 75 लाखांचे कर्ज आरोपींनी फिर्यादीला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवली आणि त्यावर बनावट स्वाक्षरी करून 75 लाखांचे कर्ज काढले. तसेच फिर्यादी महिलेच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि घरात शांतता नांदावी यासाठी आपल्या पत्नीसोबत अघोरी पुजा केली. तसेच या पुजेदरम्यान, तिला सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - पुण्यात डेटिंग अॅपवरुन फसवणूक, तरुणीसोबत 50 वर्षाच्या व्यक्तीने ठेवले मनाविरुद्ध शारिरिक संबंध याप्रकरणी पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत. मांत्रिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.