• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 9 राज्यातील तरुणांची फसवणूक; पोलिसांनी आवळल्या 7 जणांच्या मुसक्या

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 9 राज्यातील तरुणांची फसवणूक; पोलिसांनी आवळल्या 7 जणांच्या मुसक्या

चार राज्यातून सात जणांना पोलिसांनी अटक केली . त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

 • Share this:
  नांदेड, 21 जून : रेल्वे विभागात (Railway jobs) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक (fraud with young people) करणाऱ्या सात जणांना हिंगोली पोलिसांनी (Hingoli police) अटक केली . चार राज्यातून सात जणांना पोलिसांनी अटक केली . त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . देशात नऊ राज्यातील तरुणांना या टोळीने फसवणूक केल्याचे नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पंडित ढवळे नामक युवकाने 13 मे 2021 रोजी वसमत पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दिली. रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आरोपी संतोष सरोज याने पंडित ढवळेकडून दहा लाख रुपये घेतले होते. याच गुन्ह्याचा तपास करतांना हिंगोली पोलिसांनी या टोळीला अटक केली . ओडीसा येथून 46 वर्षीय रवींद्र दयानिधी संकवा ,उत्तरप्रदेश  55 वर्षीय मधून ऍड नरेंद्र विष्णदेव प्रसाद आणि मुख्य आरोपी 29 वर्षीय संतोष कुमार सरोज ,नवी दिल्लीतून 46 वर्षीय अभय मेघश्याम रेडकर ,अंबरनाथ ठाणे येथून 56 वर्षीय गौतम एकनाथ फणसे ,लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथुन 24 वर्षीय सतीश तुळशीराम हंकारे आणि 24 वर्षीय आनंद पांडुरंग कांबळे यांना पोलिसांनी अटक केली . हे वाचा - आता करिअरमध्ये बिनधास्त जपा कलेची आवड; जाणून घ्या काय आहे Product Designing आरोपीकडून रेल्वे ,वन विभाग (Forest department) ,बृहन्मुंबई महापालिकेचे (BMC) बनावट नियक्तीपत्र ,विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट शिक्के ,सात मोबाईल ,एक लॅपटॉप असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . आरोपींनी वापरलेली अठरा बँक खाती होल्ड करण्यात आली .या आरोपींनी महाराष्ट्र (Maharashtra) ,ओडीसा (Odisha), आंध्र प्रदेश (AP) ,तेलंगणा (Telangana), मध्यप्रदेश (MP) ,उत्तरप्रदेश (UP) ,हरियाणा (Haryana) , दिल्ली (Delhi) ,पश्चिम बंगाल (West Bengal) या राज्यातील तरुणांची फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली . नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा हे आरोपी घालायचे . काही तरुणांना नियुक्तीपत्र देऊन त्यांनी कोलकत्यात ट्रेनिंग देखील दिली . पुढे दोन महिन्याचे पगार देखील दिले . दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून पोलीस अधिक तपास करत आहेत .अश्या पद्धतीने ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी हिंगोली पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले .
  Published by:Meenal Gangurde
  First published: