आता बिनधास्त जपा कलेची आवड आणि मिळवा गलेलठ्ठ पगार; जाणून घ्या काय आहे Product Designing

बारावीनंतर हा कोर्स करून विद्यार्थी आपली कला क्षेत्रांतील आवड जपत भरघोस पैसे कमवू शकता

बारावीनंतर हा कोर्स करून विद्यार्थी आपली कला क्षेत्रांतील आवड जपत भरघोस पैसे कमवू शकता

  • Share this:
    मुंबई, 21 जून : दहावीनंतर आणि बारावीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना कलेची प्रचंड आवड असते. लहानपणी पालक मुलांना चित्रकलेशी (Art jobs) निगडित काही क्लासेस लावून देतात त्यामुळे त्यांना कला क्षेत्रात आवड निर्माण होते. मात्र दहावी आणि बारावीनंतर त्यांना आपली कला क्षेत्रातील आवड जपता येत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे कला क्षेत्रातील नोकरीचं प्रमाण. कला क्षेत्रात नोकरी नाहीत्यामुळे पालकही मुलांना आवड जपू देत नाहीत. मात्र तुम्हाला प्रॉडक्ट डिझायनिंगबद्दल (Product Designing) माहिती आहे का? बारावीनंतर हा कोर्स करून विद्यार्थी आपली कला क्षेत्रांतील आवड जपत भरघोस पैसे कमवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या कोर्सबद्दल. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांचे खेळणे, स्टायलिश आणि स्मार्ट फर्निचर, गॅझेट, डिझाइनर (Gadget Designing) वॉच किंवा घरातील उपकरणं या सर्व गोष्टींचा आकार, त्यांचं वजन, त्यावरील स्टायलिश डिझाईन  तयार करण्याचं काम प्रॉडक्ट डिझायनर करतात. आपली क्रिएटिव्हिटी वापरून ते निरनिराळे प्रोडक्ट डिझाईन (Product Designer) करतात. यात कलेची गरज असतेच. हे वाचा - बारावी Science नंतर केवळ इंजिनिअरिंगच नाही तर 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर प्रोडक्ट डिझाइनर व्यावसायिक प्रोडक्ट कंपन्यांसाठी (Product Company) आर्टिकल्स, प्रोडक्टस आणि मटेरियल डिझाइन (Product Material Design) करतात. काहीही डिझाइन करण्यापूर्वी ते त्याच्या व्हिज्युअल अपीलची आणि प्रॅक्टिकल वापराची पूर्ण काळजी घेतात. मार्कैट रिसर्चर्स (Market Researchers), ऍडव्हर्टीझिंग टीमसोबत (Advertising team) काम करावं लागतं. कोणते स्किल असणं आवश्यक एक प्रोडक्ट डिझायनर होण्यासाठी तुम्हाला आर्टिस्टिक आणि लॉजिकल थिंकर असणं आवश्यक आहे. तसंच यासाठी तुमचं ऑबझर्वेशन चांगलं असणं आवश्यक आहे. एखाद्या प्रोडक्टच्या चारही बाजूनं त्याला बघून आयडियानुसार त्याला डिझाईन करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक सायन्स स्ट्रीममधून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (National Institute of design, Ahmadabad) किंवा आयआयटी कडून इंडस्ट्रियल डिझाइनचा कोर्स करुन प्रॉडक्ट डिझायनिंगच्या क्षेत्रात येऊ शकतात. तसंच इंजिनिअरिंगनंतरही हा कोर्स करता येऊ शकतो. हे आहेत प्रमुख कॉलेजेस इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर, आयआयटी बॉम्बे (Industrial design center, IIT Bombay) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद (National Institute of design, Ahmadabad) एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे (MIT Institute of Design, Pune) सिंबायोसिस इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणे (Symboisis Institute of Design, Pune)
    Published by:Atharva Mahankal
    First published: