'लग्न'वाल्या बाबाचा प्रताप; आधीच 5 लग्न, सहाव्याची तयारी आणि 32 तरुणींसोबत इंग्रजीमध्ये चॅटिंग

तरुणींसोबत चॅटिंग करताना तो स्वत:ला पेशाने शिक्षक असल्याचं सांगत होता आणि कधी कधी तर हॉटेलचा मालक असल्याचंही खोटं सांगत असे. 8वी पर्यंत शिकलेला हा बाबा बीएससी पास असल्याचं सांगून तरुणींसोबत इंग्रजीमध्ये चॅटिंग करीत होता.

तरुणींसोबत चॅटिंग करताना तो स्वत:ला पेशाने शिक्षक असल्याचं सांगत होता आणि कधी कधी तर हॉटेलचा मालक असल्याचंही खोटं सांगत असे. 8वी पर्यंत शिकलेला हा बाबा बीएससी पास असल्याचं सांगून तरुणींसोबत इंग्रजीमध्ये चॅटिंग करीत होता.

  • Share this:
    कानपुर, 18 जून :  उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे पोलिसांनी एका बाबाला अटक केली आहे. या बाबाचा भूतकाळ आणि वर्तमान एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. पाच लग्न केल्यानंतर हा बाबा सहाव्या लग्नाची तयारी करीत होता. वेळेत या बाबाचं बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काय आहे प्रकरण? बाबाचं खरं नाव अनुज चेतन कठेरिया आहे. जो मूळचा शाहजहापूर येथील राहणारा आहे. या ढोंगी बाबाने आधीच पाच लग्न केली आहेत, आणि तो सहाव्या लग्नाची तयारी होता. पाचवं लग्न त्याने श्याम नगर येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर ढोंगी बाबा आपल्या पाचव्या पत्नीला त्रास देऊ लागला. ज्यानंतर महिलेने 11 मे रोजी पोलीस ठाण्यात बाबाविरोधात तक्रार केली. याशिवाय किदवई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी अनुज किदवई एक भाड्याच्या फ्टॅटमध्ये राहत होता. या प्रकरणात जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा बाबाचं काळं समोर आलं. पोलिसांनी कारवाई करीत शुक्रवारी त्याला अटक केली आहे. मॅट्रिमोनियल साइट्सवर तयार केले होते अनेक प्रोफाइल  पोलिसांनी जेव्हा बाबाची कुंडली काढली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. बाबाने शाहजहांपुरमधील कामाख्या बंजारे बाबा कल्याण सेवा ट्रस्टच्या नावावर तंत्र-मंत्रचा अड्डा केला होता. तेथे आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या तरुणींना बाबा जाळ्यात अडकवत होता. याशिवाय मॅट्रिमोनियल साइट्सवरही त्याने आपले अनेक प्रोफाइल तयार केले होते. ज्याच्या माध्यमातून कथित बाबा धर्म, आणि जाती बदलून तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. त्यांच्याशी लग्न करून, त्यांचे शारिरीक शोषण करून पैसे उकळवून सोडून देत होता. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-गाडी चालवताना ठेवले शारिरीक संबंध; भयंकर अपघातात महिलेचा मृत्यू 32 मुलींसोबत करीत होता चॅटिंग  डीसीपी साउथ रवीना त्यागी यांनी सांगितलं की, अनुजने एक मॅट्रीमोनियल साइटवर लकी पांडेय नावाने आपला प्रोफाइल तयार केला होता. ज्यात तब्बल 32 मुलींसोबत चॅटिंग करीत असल्याचं समोर आलं आहे. याबाबाचे सर्व रेकॉर्ड पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुलींसोबत चॅटिंग करताना तो स्वत:ला पेशाने शिक्षक असल्याचं सांगत होता आणि कधी कधी तर हॉटेलचा मालक असल्याचंही खोटं सांगत असे. 8वी पर्यंत शिकलेला हा बाबा बीएससी पास असल्याचं सांगून तरुणींसोबत इंग्रजीमध्ये चॅटिंग करीत होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published: