अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सेन जोस शहरात एका ट्रक ड्रायव्हरवर महिलेची हत्या आणि दोन जणांना जखमी करण्याचा आरोप आहे. सांगितलं जात आहे की, ड्रायव्हर चालत्या ट्रकमध्ये ओरल सेक्स करीत होता. त्यात ही दुर्घटना घडली आहे. अपघाताच्या वेळी तो नशेतदेखील होता.
या दुर्घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्यासोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकने धडक दिल्याने हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करीत त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
या घटनेनंतर लोकांनी राग व्यक्त केला आहे. ट्रक चालकाला कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक ड्रायव्हर पहिल्यांदा नशेत वेश्याबरोबर पबमध्ये गेला होता. मात्र येथे त्याला आत येण्यास मनाई करण्यात आली. त्यामळे रागाच्या भरात तो बाहेर गेला आणि पार्किंगमध्ये पोहोचला.
दोघेजणं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जाऊन बसले. बराच वेळ तो तेथेच बसून होता. काही वेळाने तो ट्रक मागे घेऊ लागला. यादरम्यान त्याने काहीच पाहिलं नाही. त्याने ट्रक इतक्या जोरात मागे घेतला की, मागे उभ्या असलेल्यांना हटण्यासाठी वेळही मिळाला नाही.
Los Angeles Times ने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने दारुव्यतिरिक्त कोकोनची नशा केली होती. जी बेकायदेशीर आहे. जेव्हा ट्रक ड्रायव्हर पार्किंगच्या बाहेर निघण्यासाठी ट्रक मागे घेत होता तेव्हा त्याच्या गाडीचा स्पी 45 किलोमीटर होता.
यादरम्यान त्याने महिलेसोबत ओरल सेक्स केलं. महिला आणि ट्रक ड्रायव्हर इतक्या नशेत होते की, त्यांना ट्रकच्या स्पीडचा अंदजाही आला नाही. आणि हा अपघात घडला. यानंतर ड्रायव्हरने आपल्या ट्रकने सैन जोस नावाच्या एका बारला धडक दिली