भोपाळ, 31 ऑगस्ट : दोघांची ऑनलाईन ओळख झाली, मैत्री झाली. हळूहळू दोघांनी शारीरिकरित्या एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 2 हजार रुपये घेऊन तरुणी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार झाली. तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात तो इतका अडकला होता की त्याने ही अट मान्य केली. पण जेव्हा ती प्रत्यक्षात घरी आली तेव्हा त्याच्यावरील तिच्या सौंदर्याची नशाच उतरली. तिला तो सौंदर्यवती, तरुणी समजत होता तिचं खरं रूप पाहून त्याला दरदरून घाम फुटला. भीतीने त्याने तिची हत्या केली. तिच्या शरीराचे दोन तुकडे केले. मध्य प्रदेशच्या इंदोरमधील ही धक्कादायक घटना. मंगळवारी रस्त्याशेजारी धड सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अखेर पकडलं. त्यानंतर त्याने या हत्येची कबुली देत याबाबत धक्कादायक खुलासा केला. नूर मोहम्मद असं आरोपीचं नाव आहे. माहिती नुसार नूरचं लग्न झालं आहे. त्याची बायको प्रेग्नंट होती, जी काही दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती. नूरची मोहसीन उर्फ जोया नावाच्या तरुणीशी ऑनलाइन ओळख झाली. काही दिवस दोघांमध्ये मैत्री होती. नंतर दोघांनी आणखी जवळ येण्याचा निर्णय घेतला. जोयाने नूरकडून शारीरिक संबंधासाठी दोन हजार रुपयेही मागितले. हे वाचा - पैसे घेऊन परभणीतील मुलीचा जळगावात बालविवाह करण्याचा प्रयत्न, चागलं स्थळ आहे असे सांगत… जोयाच्या सौंदर्याच्या जाळ्यात नूर पुरता फसला होता. त्यामुळे तो तिला दोन हजार रुपये द्यायला तयारही झाला. अॅडव्हान्स म्हणून त्याने तिला 500 रुपये पाठवले. जोया नूरच्या घरी अशर्फी कॉलनीत पोहोचली. तिथं पोहोचताच तिने शिल्लक रक्कमही नूरकडून घेतली. जसे जोयाने कपडे काढले, तसं तिचं खरं रूप समोर आलं. जिला तरुणी समजून तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात तो अडकला खरंतर ती तरुणी नव्हे तर किन्नर होता. पण त्याने आपण महिला असल्याचं सांगितलं. जोयाला प्रत्यक्षात पाहून नूर घाबरला आणि त्याने संबंध बनवायला नकार दिला. पण जोया त्याच्यावर जबरदस्ती करू लागली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. वादावादीत नूरने जोयाचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मांस कापायच्या चाकूने तिच्या शरीराचे दोन तुकडे केले. कमरेच्या खालील भाग रस्त्याच्या कडेला फेकला आणि कमरेच्या वरील भाग घरातील पेटीत ठेवला. स्टार चौकात मंगळवारी सकाळी रस्त्याच्या कडेला हे धड दिसलं आणि खळबळ उडाली. हे वाचा - फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला प्रियकर, नंतर बेशुद्ध करून 70 वर्षाच्या वृद्धासह 5 लोकांचे सामूहिक दुष्कर्म इंदोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घरातील पेटीतून धड आणि शरीर कापण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.