Home /News /crime /

Rebecca Landrith : माजी मॉडेलची निर्घृण हत्या, मृतदेहासोबत केलं धक्कादायक कृत्य

Rebecca Landrith : माजी मॉडेलची निर्घृण हत्या, मृतदेहासोबत केलं धक्कादायक कृत्य

माजी मॉडेल रेबेका लँड्रीथची (Rebecca Landrith) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. मॉडेलच्या डोक्यात, मानेवर आणि छातीवर अनेक गोळ्यांचे घाव आढळून आले. इतकंच नाही तर तिच्या मृतदेहासोबतही घाणेरडं कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 13 फेब्रुवारी : माजी मॉडेल रेबेका लँड्रीथची (Rebecca Landrith) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. रेबेकाचा मृतदेह पेनिसिल्वेनियामध्ये एका रस्त्याच्या  कडेला आढळून आला. मॉडेलच्या डोक्यात, मानेवर आणि छातीवर अनेक गोळ्यांचे घाव आढळून आले. इतकंच नाही तर तिच्या मृतदेहासोबतही घाणेरडं कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेबेकाला तब्बल 18 गोळ्या मारण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोलिसांना सापडला, त्याच्या काही तास आधीच ही हत्या झाली आहे. पोलिसांनी सांगितलं, की शवविच्छेदनानंतर रेबेकाची 18 गोळ्या मारून हत्या केल्याची बाब समोर आली आहे. जेव्हा तिचा मृतदेह हाती लागला तेव्हा पोलिसांना तिच्याजवळ काहीही ओळखपत्र किंवा ओळख पटवण्यासाठी इतर गोष्टी सापडल्या नाही. यानंतर तिचे फिंगरप्रिंट घेण्यात आले, तेव्हा तिची ओळख पटली. आरोपी अटकेत - पोलिसांनी रेबेकाच्या हत्येच्या संशयात एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीची ओळख ट्रैसी रोलिंस नावानं झाली आहे. घटनास्थळापासून 250 मिल अंतरावरून ट्रैसीला ताब्यात घेण्यात आलं आहे.त्याच्यावर हत्या आणि मृतदेहासोबत घाणेरडं कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या 28 वर्षीय तरूणीला अटक करण्यात आली, तेव्हा तो ब्लीचनं आपला ट्रक साफ करत होता. पोलिसांना त्याच्या ट्रकमध्ये रक्ताचे डाग आणि गोळीचे शेल मिळाले आहेत. पोलिसांनी मोबाईल डाटा आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही बाब समोर आली, की रेबेकाची हत्या झाली तेव्हा आरोपीचं लोकेशन तिथंच दाखवलं गेलं होतं. रेबेकाच्या हत्येच्या वृत्तानंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रेबेका 5 भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिनं 2014 मध्ये आपल्या प्रोफेशनल करिअरची सुरूवात केली होती. 2014 मध्ये झालेल्या स्पर्धेत ती मिस मैनहेटनची फाइनलिस्टही ठरली होती. रेबेकाचं नाव मॉडेल आणि फॅशन इंडस्ट्रीत प्रसिद्ध होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Model, Murder, Shot dead

    पुढील बातम्या