Gold Racket Case: 'मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही मिळाला पुरावा', NIA ने केला महत्त्वाचा खुलासा

Gold Racket Case: 'मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही मिळाला पुरावा', NIA ने केला महत्त्वाचा खुलासा

Foreign Currency Smuggling: केरळच्या मुख्यमंत्र्यांचा परकीय चलन तस्करीत हात असल्याचा आरोप एका सोने तस्कराने केला होता. यानंतर केरळमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं असून NIA ने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 06 मार्च: केरळमधील सोने तस्करीतील मुख्य आरोपी (Gold Smuggling Accused) स्वप्ना सुरेश याने केरळच्या मुख्यमंत्र्यांवर (Kerala CM) गंभीर आरोप केला होते. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन ( Pinarayi Vijayan) यांचा परकीय चलन तस्करीत हात असल्याचा आरोप संबंधित सोने तस्कराने केल्याची माहिती कस्टम आयुक्त सुमित कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली होती. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. कारण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुमित कुमार यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळी माहिती दिली आहे.

अवैध प्रतिबंध कायद्यांतर्गत या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनं (NIA) वेगळा खुलासा केला आहे. NIA म्हटलं की, मुख्यमंत्री विजयन यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा एकही पुरावा मिळालेला नाही. असं असलं तरी, याआधी कस्टम आयुक्त सुमित कुमार यांनी केरळ उच्च न्यायालयात दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, स्वप्ना सुरेशने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कुमार यांच्या मते, स्वप्ना सुरेशने एर्नाकुलम दंडाधिकाऱ्यासमोर हा खुलासा केला होता.

(हे वाचा-बाँब बनवताना स्फोट की कार्यकर्त्यांवर हल्ला? भाजपमधील 6 जण जखमी)

याशिवाय स्वप्ना यांनी केरळ विधानसभा अध्यक्ष आणि तीन कॅबिनेट मंत्र्यांवरदेखील परकीय चलन तस्करीचा आरोप लावला होता. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर हे आरोप केल्याने सत्ताधारी पक्षासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुख्यमंत्र्यांना पुरतं घेरलं आहे. सध्या केरळमध्ये गोल्ड रॅकेट प्रकरणाची (Gold Racket Case) चौकशी पाच केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या म्हणण्यानुसार, हा तपास राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे.

जुलै महिन्यात 30 किलो सोनं जप्त केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात

गेल्या वर्षी जुलै महिन्यात कस्टम अधिकार्‍यांनी विमानतळावरून 30 किलो सोनं जप्त केलं होतं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या सोन्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी आहे. यानंतर मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने पोलीस चौकशीत अनेक गंभीर खुलासे केले आहेत. या प्रकरणात राज्यातील अनेक राजकीय व्यक्तींची नावं समोर आली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नावाचा खुलासाही झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: March 6, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या