कर्नाटक : एका खोट्या तक्रारीवरुन फूड डिलिव्हरी बॉलला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 8 वर्षांच्या मुलीनं फूड डिलिव्हरी बॉयची खोटी तक्रार केल्यानं हा प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बंगळुरू इथे घडल्याची माहिती मिळाली आहे. तिने आपल्या आई वडिलांना खोटी माहिती दिल्यानं फूड डिलिव्हरी बॉयचं नुकसान झालं आणि मारहाण देखील करण्यात आली. 8 वर्षांच्या मुलीनं सांगितलं की डिलिव्हरी एजंटने तिला घराच्या छतावर जबरस्ती नेलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर सुरक्षारक्षक आणि सोसायटीतील लोकांना फूड डिलिव्हरी बॉयची बाजू ऐकून न घेता त्याला बेदम मारहाण केली. नंतर सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आलं. त्यावेळी मुलगी एकटीच छतावर गेल्याचं सत्य उघडकीस आलं.
वागाराच्या मॅनेजरचं हादरवणारं कांड; मृतदेहांसोबत करायचा संतापजनक काम, अखेर अटकइंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार आई वडील आपल्या मुलीला शोधत बिल्डिंगच्या टेरेसवर पोहोचले. तिथे तिला तू इथे कशी आलीस याची विचारपूस केली. त्यावेळी तिने सांगितलं की फूड डिलिव्हरी एजंट इथे जबरदस्ती घेऊन आला. संतापलेल्या पालकांनी तात्काळ सुरक्षा रक्षकाला बोलवून अपार्टमेंटचं गेट बंद करायला सांगितलं. मुलीचे गंभीर आरोप असल्याने सोसायटीतील लोकांना त्याला बेदम मारहाण केली.
शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र पोलिस येण्यापूर्वीच त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मुलीने तिच्या पालकांशी खोटे बोलल्याचे सांगितले. ती एकटीच गच्चीवर गेली. जेव्हा पोलिसांनी मुलीला विचारले की तिने खोटा दावा का केला, तेव्हा तिने सांगितले की तिला भीती वाटते की तिचे पालक वर्गात खेळताना तिला मारहाण करतील. सत्य बाहेर आल्यानंतर मुलीच्या पालकांनी नंतर डिलिव्हरी एजंटची माफी मागितली.
बायको आणि भाऊच ठरला वैरी! प्रेमात नवऱ्याने गमावला जीव, ‘असा’ रचला कटTOI शी बोलताना डिलिव्हरी एजंट म्हणाला, “सुरक्षा रक्षकांसह सर्व लोकांनी मला मारहाण केली. मी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिसांचे आभार मानतो, त्यांच्यामुळे मी वाचलो. जर सीसीटीव्ही कॅमेरे नसते तर काय झाले असते? हा विचारही करू शकत नाहीत.