जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पुण्यात चाललंय काय? शाळेतच 12 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात चाललंय काय? शाळेतच 12 वर्षीय मुलाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (प्रतिकात्मक फोटो)

7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार (प्रतिकात्मक फोटो)

एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 30 जून : पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुण्यात तरुणीवर हल्ला झाला तेव्हा पोलीस कुठे होते?आयुक्तांची मोठी कारवाई मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर बुधवारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केलेल्या पुणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. आता या 12 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना समुपदेशनाचा आधार दिला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी 12 वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातून नुकतीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात मित्रानेच MPSC करणाऱ्या मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यावेळी मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. ज्यामुळे तिचे प्राण वाचले. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात