चंद्रकात फुंदे, प्रतिनिधी पुणे : पुण्यात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. इतरवेळी पुण्यात वेळोवेळी गस्त घालणारे पोलीस ही घटना घडली तेव्हा कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. पेरूगेट पोलीस चौकीतील तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. हल्ला झाल्यानंतर लोक आरोपीस पकडून घेऊन पेरूगेट पोलीस चौकीला गेले असता तिथे एकही पोलीस हजर नव्हते. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर पोलीस आल्यानं तीन जणांवर ही कारवाई केली जात आहे. मित्रानेच MPSC करणाऱ्या मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यावेळी मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. ज्यामुळे तिचे प्राण वाचवले. एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याआधी दर्शना पवार हत्या प्रकरण चर्चेत असताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.