लखनऊ 21 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (AOA) च्या निवडणुकीवरून गदारोळ झाला आहे. येथे सुरक्षारक्षक आणि रहिवाशांमध्ये वाद झाला, त्यानंतर हाणामारी सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रकरण सेक्टर 78 हाइड पार्क सोसायटीमधील आहे. सध्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी याप्रकरणी सेक्टर 113 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घरात आला आणि मुलाशी बोलत होता, लोकांनी पकडून दिला चोप, भिवंडीतला LIVE VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, हाइड पार्क सोसायटीमध्ये एओएच्या निवडणुकीबाबत अनेक दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. सोसायटीच्या लोकांनी आरोप केला की AOA च्या माजी टीमने कोणतीही निवडणूक न घेता बिनविरोधच पुन्हा स्वतःची निवड केली. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी यावर बहिष्कार टाकला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या. नुकतीच AOA ची नवीन टीम जिंकून आली. गुरूवारी सोसायटीत AOA टीमच्या जनरल बॉडीची बैठक होती, त्यात अचानक सोसायटीचे गार्ड आले, त्यानंतर रहिवाशी आणि गार्ड्समध्ये वाद झाला.
नोएडामध्ये अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (AOA) च्या निवडणुकीवरून गदारोळ झाला आहे. येथे सुरक्षारक्षक आणि रहिवाशांमध्ये वाद झाला, त्यानंतर हाणामारी सुरू झाली pic.twitter.com/Kkepv84b01
— News18Lokmat (@News18lokmat) October 21, 2022
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून अंदाज बांधता येतो की काय परिस्थिती असेल. नवीन AOA टीमने सोसायटीची जुनी सुरक्षा एजन्सी काढून नवीन सुरक्षा एजन्सी लावली आहे. त्याचबरोबर या भांडणात काही महिला जखमी झाल्या असून, त्यांना पोलिसांनी मेडिकलसाठी पाठवलं आहे. सोसायटीमधील लोकांनी गार्ड्स आणि माजी एओएच्या टीमविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
ठाण्यात रिक्षाचालकाचं संतापजनक कृत्य, रेल्वे स्टेशनबाहेरच तरुणीचा विनयभंग, सीसीटीव्हीत घटना कैद
हाइड पार्क सोसायटीत राहणारे अजय पाठक यांनी सांगितलं की, माजी AOA च्या टीमला कोणतीही निवडणूक न घेता बिनविरोध घोषित करण्यात आलं. विरोध केल्यावर येथे राहणाऱ्या लोकांवर सोसायटीच्या गार्ड्सकडून हल्ले केले जात आहेत. आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलो आहोत. सोसायटीतील रहिवासी महिलेनं सांगितलं की, सोसायटीमध्ये मीटिंग सुरू होती, त्यावेळी अचानक माजी एओए टीमच्या सांगण्यावरून सोसायटीचे रक्षक आले आणि त्यांनी बैठकीला आलेल्या रहिवाशांवर हल्ला केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral