• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Call Girl च्या सप्लायवरून हाणामारी, आवडलेली सोडून दुसरीच तरुणी पाठवल्याने राडा

Call Girl च्या सप्लायवरून हाणामारी, आवडलेली सोडून दुसरीच तरुणी पाठवल्याने राडा

जी कॉलगर्ल पसंत केली होती, त्याऐवजी (Fight over call girl supply exposes sex racket in the city) दुसरीच कॉलगर्ल पाठवल्याच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना उघड झाली आहे.

 • Share this:
  जयपूर, 18 ऑक्टोबर : जी कॉलगर्ल पसंत केली होती, त्याऐवजी (Fight over call girl supply exposes sex racket in the city) दुसरीच कॉलगर्ल पाठवल्याच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे अख्खं सेक्स रॅकेट उघड (Sex racket exposed) झालं असून व्हॉट्सअपच्या आधारे हा धंदा सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हॉट्सअपवर दाखवलेला तरुणीचा फोटो आणि प्रत्यक्षात पाठवण्यात आलेली तरूणी यात तफावत असल्याचं लक्षात आल्यानंतर ग्राहक असणाऱ्या आरोपींनी पुरवठा (Criminals attacked suppliers) करणाऱ्यांवर जोरदार हल्ला करत राडेबाजी केली. असं चालत होतं रॅकेट राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये व्हीआयपी एस्कॉर्ट सर्व्हिस नावाचे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवरून कॉलगर्लचा पुरवठा केला जात असे. या ग्रुपवर ग्राहक त्यांची मागणी नोंदवत असत. त्यानंतर त्यांना कॉलगर्लचे पर्याय दिले जात. कॉलगर्लच्या निवडीनंतर तिच्या दरावरून चर्चा होत असे. सौदा निश्चित झाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी कॉलगर्लला पोहोचवण्यात येत असे. मात्र घटनेच्या दिवशी ठरलेल्या तरुणीऐवजी वेगळ्याच तरुणीला पाठवल्यानंतर ग्राहक संतप्त झाले आणि त्यांनी जाब विचारला. त्यावरून जोरदार हाणामारी झाली आणि भर रस्त्यात राडेबाजी सुरु झाली. अशी उघड झाली घटना आपला भाऊ हॉटेलमध्ये उतरला असून त्याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार एकाने आमेर पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला हा व्यवसाय पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 9 ऑक्टोबर रोजी ठरलेला हा व्यवहार ज्या हॉटेलसाठी होता, त्याच हॉटेलमध्ये तक्रारदार तरुण राहत होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना सेक्स रॅकेटचा शोध लागला. हे वाचा- पातेल्यात बसून नवरा नवरी पोहोचले मंडपात, एका लग्नाची ‘भन्नाट’ गोष्ट पोलिसांनी केली कारवाई पोलिसांनी या प्रकऱणी काही आरोपींना ताब्यात घेतलं असून कॉलगर्ल मुलीला नोटीस जारी केली आहे. या धंद्याची पाळंमुळं किती खोल पोहोचली आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच याच्या मास्टरमाइंडला शोधून गजाआड करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
  Published by:desk news
  First published: