Home /News /crime /

1 वर्षाच्या मुलीसोबत वडिलांचं धक्कादायक कृत्य, आई व्हिडिओ बनवत राहिली, पाहून संतापले नेटकरी

1 वर्षाच्या मुलीसोबत वडिलांचं धक्कादायक कृत्य, आई व्हिडिओ बनवत राहिली, पाहून संतापले नेटकरी

यात अवघ्या एक वर्षाच्या मुलीच्या तोंडात सिगरेट दिल्याचं दिसतं. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे मुलीने ही ई-सिगरेट तोंडाने खेचून नाकातून धूर काढला.

    नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : धुम्रपान कोणाच्याही आरोग्यासाठी हानिकारक (Smoking Is Injurious To Health) आहे. सिगरेटच्या डब्यावरच मोठ्या अक्षरात याबद्दल वॉर्निंगही दिलेली असते. मात्र तरीही लोक स्मोकींग करतात. लोक सिगरेट आणि तंबाखूच व्यसन करून आपला जीव धोक्यात टाकतात. आता तर बाजारात ई-सिगरेटही आल्या आहेत. नुकताच सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका पिताच आपल्या मुलीला ई सिगरेट देताना दिसत आहे (Father Gave E- Cigeratte to 1 Year old Baby). 7 राज्यातील 14 जणींशी थाटला संसार, FAKE डॉक्टरचा सातव्या पत्नीनं केला पर्दाफाश फेसबुकवर Inforoadblock नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात अवघ्या एक वर्षाच्या मुलीच्या तोंडात सिगरेट दिल्याचं दिसतं. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे मुलीने ही ई-सिगरेट तोंडाने खेचून नाकातून धूर काढला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. लोकांना विश्वास बसत नाहीये की पालक एवढे बेजबाबदार कसे असू शकतात. या मुलीला याची कल्पनाही नाही की तिच्या तोंडात किती घातक वस्तू आहे. सांगितलं जात आहे की व्हायरल होणारा हा व्हिडिओ मलेशियाचा आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, या मुलीचं वय साधारण एक वर्ष असेल. मुलीला तिच्या पालकांनीच ई-सिगरेट दिली. सांगितलं जात आहे की तिच्या वडिलांना तिला सिगरेट पिण्यासाठी दिली आणि आई तिचा व्हिडिओ बनवत राहिली. मुलीनं सिगरेट तोंडात घेऊन नाकातून धूर काढला. मुलीच्या पालकांना याचा अभिमान वाटल्याचं दिसलं. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे. लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. नांदेडच्या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणारं 'Suicide Song' नेमकं काय आहे? किड्स हेल्थच्या रिपोर्टनुसार, ई सिगरेट्स आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. यात निकोटीन भरपूर अॅकटिव्ह असतं. मुलांच्या शरीरा निकोटीन गेल्याने त्यांच्या मेंदूचा विकास मंदावतो. सोबत त्यांच्या स्मरणशक्तीवरही याचा परिणाम होतो. अशात एका आई आणि वडिलांचं हे कृत्य नक्कीच धक्कादायक आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Smoking

    पुढील बातम्या