मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलीस क्वार्टरमध्ये महिला सब इन्स्पेक्टरची आत्महत्या; स्वत:च्या बंदुकीनेच संपवलं जीवन

पोलीस क्वार्टरमध्ये महिला सब इन्स्पेक्टरची आत्महत्या; स्वत:च्या बंदुकीनेच संपवलं जीवन

 स्वत:च्याच सर्विस रिवॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. या खळबळजनक वृत्तामुळे पोलीस टीमला धक्का बसला आहे.

स्वत:च्याच सर्विस रिवॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. या खळबळजनक वृत्तामुळे पोलीस टीमला धक्का बसला आहे.

स्वत:च्याच सर्विस रिवॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. या खळबळजनक वृत्तामुळे पोलीस टीमला धक्का बसला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

दरभंगा, 10 डिसेंबर : बिहारमधील (Bihar) दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ट्रेनी महिला पोलिसने (Trainee female sub inspector) आत्महत्या केली. या महिला पोलिसाची दरभंगातील कॉलेजमधील ठाण्यात ड्यूटी होती. त्यांनी स्वत:च्याच सर्विस रिवॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. या खळबळजनक वृत्तामुळे पोलीस टीमला धक्का बसला आहे. ट्रेनी महिला पोलीस सुपॉल (Supaul) जिल्ह्यातील राहणारी होती.

महिला पोलीस लक्ष्मी कुमारी (Laxmi Kumari) 2018 मध्ये सब इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी नियुक्त करण्यात आली होती. या वेळी ट्रेनी म्हणून त्या काम करीत होत्या. SI लक्ष्मी यांनी गुरुवारी रात्री साधारण 12 ते 2 च्या दरम्यान सर्विस रिवाल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. गोळी डोक्यात घालण्यात आली आहे. ही घटना श्यामा माई मंदिर परिसर स्थित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या क्वार्टरमध्ये झाली. शुक्रवाकी सकाळी याबाबत माहिती मिळाली. तेव्हा लक्ष्मीची सोबती काम संपल्यावर क्वार्टरमध्ये गेली होती. दार ठोठावलं तरी लक्ष्मीने दार उघडलं नाही. यानंतर तिने पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली.

हे ही वाचा-गर्लफ्रेंडच्या घरी आक्षेपार्ह गोष्ट पाहून उडाला भडका, 31 वार करून काढला राग

तपासासाठी मुजफ्फरपूर येथून फॉरेन्सिक टीम बोलावली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दार उघडलं तेव्हा जमिनीवर लक्ष्मीचा मृतदेह पडला होता. आणि तिच्या उजव्या हातात सर्विस रिव्हॉल्वर होती. लक्ष्मीचं लग्न झालं नव्हतं. सध्या तिच्या लग्नासाठी मुलगा पाहायचा कार्यक्रम सुरू होता. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीने स्कूटी खरेदी केली होती.

घटनेची सूचना मिळताच लक्ष्मीचे वडील त्रिलोकी प्रसाद दरभंगा येथे दाखल झाले. मुलीच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लक्ष्मीने स्वत:च्या सर्विस रिव्हॉल्वरचे स्वत:च्या डोक्यात गोळी घालून जीवन संपवलं. अद्याप यामागील नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही. तरी लक्ष्मीसोबत क्वार्टरमध्ये राहणारी सहकारी आणि कुटुंबाची चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Police, Suicide