ब्रिटन, 9 डिसेंबर: आपल्या एक्स-गर्लफ्रेंडच्या (Ex-girlfriend) घरात अचानक घुसलेल्या बॉयफ्रेंडला (Boyfriend) तिच्या बाथरुममध्ये कंडोमचं रॅपर (Condom wrapper in the bathroom) दिसल्यानंतर त्याच्या रागाचा पारा चढला. राग अनावर झाल्यामुळे त्याने आपल्याकडील धारदार चाकूने तिच्यावर एकामागून (Stabbed multiple times) एक वार करायला सुरुवात केली. महिलेनं यात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तरुणाने तिच्यावर एकूण 31 वार केले. आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध असणं ही बाब असह्य झाल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचं त्यानं सांगितलं. जबरदस्तीनं घुसला घरात ‘मिरर युके’नं दिलेल्या रिपोर्टनुसार 33 वर्षांच्या क्रिस ब्लॅकमोर याचं एका महिलेसोबत प्रेमप्रकरण होतं. मात्र त्यांच्यात झालेल्या वादानंतर काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. महिलेनं क्रिसला पुन्हा आपल्यात आयुष्यात न येण्याची तंबी देत त्याच्यापासून फारकत घेतली होती. मात्र घटनेच्या दिवशी क्रिस जबरदस्तीनं एक्स गर्लफ्रेंडच्या घरात घुसला आणि खोल्यांमध्ये काही गोष्टी शोधू लागला. शोध घेता घेता अचानक तो बाथरूममध्ये गेला. तिथं त्याला एक कंडोमचं रॅपर सापडलं. ते पाहून त्याच्या रागाचा पारा चढला आणि त्याने गर्लफ्रेंडला धडा शिकवण्याचा निर्णय़ घेतला. स्वतःजवळचा धारदार चाकू वापरत त्याने तरुणीवर वार करायला सुरुवात केली. मुलादेखत हल्ला यावेळी महिलेचा 7 वर्षांचा मुलगा घरी होता. मात्र त्याची बिलकूल तमा न बाळगता त्याने महिलेवर वार करणं सुरूच ठेवलं. सुदैवाने महिलेनं त्यातील अनेक वार चुकवले आणि बरेच वार सहन केले. मात्र या हल्ल्यातून महिला कशीबशी बचावली. महिलेनं पोलिसांना केला फोन क्रिस हल्ला करत असताना महिलेनं प्रसंगावधान राखत स्वतःच्या मोबाईलवरून पोलिसांना फोन केला आणि परिस्थितीची कल्पना दिली. त्यामुळे तातडीनं पोलीस घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी क्रिसला ताब्यात घेतलं. त्यामुळेच महिलेचा जीव वाचला. हे वाचा- स्टंट पडला महागात, फिल्मी स्टाईलनं थांबवत होता ट्रेन; जीव जाताच फरार झाले मित्र महिलेवर उपचार सुरू महिलेवर हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस उपचार सुरू होते. आता महिलेच्या शरीरावरील जखमा भरू लागल्या आहेत. न्यायालयाने क्रिसला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.