नितीन कुमार, प्रतिनिधी
लातूर, 21 जून : आज सगळीकडे पितृ दिवस साजरा होत आहे. पण दिवसाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात समोर आली आहे. फादर्स डे दिवशी जन्म दात्या पित्याचा मुलानेच खुन केला असल्याचं समोर आलं आहे. असाच प्रकार चाकूर तालुक्यातही समोर आलं आहे. जिल्ह्यात फादर्स डे दिवशिच दोन तालुक्यात दोन पित्याच्या क्रूर हत्येनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनेत शेतीचा वाद पित्यास भोवला असून पोटच्या मुलांनीच स्वतःच्या पित्याची हत्या केली आहे. या घटनेत चारजन जखमीदेखील झाले आहेत. शेतीच्या किरकोळ वादातून भोसलेवाडीत ही घटना घडली आहे. तर फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याच समोर आलं आहे.
निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्यांचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू का केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचं वडिलांशी भांडणं झालं.
महिलांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; नाकातून रक्त येईपर्यंत एकमेकींना मारलं
या वादात नागनाथ याची मुलं-बायको आणि मेव्हणे यांनी ही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने पित्याला जबर मारहाण केली आणि यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या चार जणांनाही जबर मार बसला असून जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर घटनेतील सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
भावासोबत कट रचून मैत्रिणीला घरी बोलावलं, नंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
यापूर्वी जिल्ह्यात काल सायंकाळी अशीच एक घटना चाकूर तालुक्यात घडली. शेतीच्या वादातून चाकूर इथल्या माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत मारापल्ले यांचा मुलानेच प्रॉपर्टीसाठी खून केला. याप्रकारनात चाकूर पोलिसांनी मुलास अटक केली आहे. या दोन्ही घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आजच्या दिनी अशी क्रूर घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा, 3 जणांचा जागीच मृत्यू
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fathers day 2020