मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

20 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, पीडितेने लावले गंभीर आरोप

20 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, पीडितेने लावले गंभीर आरोप

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महाराजगंज जिल्ह्यातील सिसवामुंशी गावात राहणाऱ्या अली रझाने दुसरे लग्न केले असून त्याने पहिली पत्नी आणि मुलगी या दोघांना सोडले आहे. मात्र, त्याची 20 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत नैनितालमध्ये राहते.

    हाराजगंज, 17 ऑगस्ट : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एका मुलीने वडिलांवर बलात्काराचा खळबळजनक आरोप केला आहे. पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला सहकार्य केले नाही. त्यामुळे तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - महाराजगंज जिल्ह्यातील सिसवामुंशी गावात राहणाऱ्या अली रझाने दुसरे लग्न केले असून त्याने पहिली पत्नी आणि मुलगी या दोघांना सोडले आहे. मात्र, त्याची 20 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत नैनितालमध्ये राहते. पीडित मुलगी आणि तिची आई वडिलांना भेटण्यासाठी महाराजगंज येथे आली होती. मात्र, नराधम बापाने मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कार केल्यावर याची कुणाजवळ वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने आज बुधवारी एसपी डॉ. कौस्तुभ यांची भेट घेतली. तसेच आरोपी नराधम बापावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित मुलगी महाराजगंज जिल्ह्यातील थुठीबारी येथे तिच्या मावशीच्या घरी राहते. पीडितेची आईची तिच्या बापासोबत भेट झाल्यावर नराधम बापाने फसवणूक करून मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. बापाने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हेही वाचा - एकाच गावातील 3 मैत्रिणींची आत्महत्या, विष घेत संपवलं जीवन; एका विवाहितेचा समावेश दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी सदरच्या सीओंकडून चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तर या संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणाले की, सीओ या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या पीडितेच्या आरोपानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र, प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Daughter, Rape news, Up crime news

    पुढील बातम्या