जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / एकाच गावातील 3 मैत्रिणींची आत्महत्या, विष घेत संपवलं जीवन; एका विवाहितेचा समावेश

एकाच गावातील 3 मैत्रिणींची आत्महत्या, विष घेत संपवलं जीवन; एका विवाहितेचा समावेश

संबंधित गावातील फोटो

संबंधित गावातील फोटो

या तिन्ही मैत्रिणी होत्या.तसेच सर्व ठिकाणी तिन्ही सोबतच जात होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

नवाद, 17 ऑगस्ट : राज्यासह देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आता शिवणकामला जाणाऱ्या तिन्ही मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील महुली गावात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बिहारमधील नवादा जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. याठिकाणी एक महिला आणि दोन तरुणींनी एकत्र विष घेत आत्महत्या केली आहे. माहुली गावातील रामेश्वर चौहान याची 18 वर्षीय पत्नी राणी देवी, दाहू चौहान यांची 14 वर्षीय मुलगी कांचन कुमारी आणि लेखा चौहान यांची 13 वर्षीय मुलगी आशा कुमारी, अशी मृतांची नावे आहेत. या तिन्ही मैत्रिणी होत्या.तसेच सर्व ठिकाणी तिन्ही सोबतच जात होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. तिघेही नाकटी पुलाजवळ एकत्र शिवणकाम शिकायला जात होत्या. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिन्ही गावात आल्या आणि यानंतर तिन्ही जणींनी गावातच विष घेतले. त्यापैकी राणी देवी आणि आशा कुमारी या दोघींचा त्याच रात्री तर कांचन कुमारीचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, अद्याप तिघांनीही आत्महत्या का केली, याचे कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेनंतर सर्वांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. हेही वाचा -  एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रताप; प्रेमाच्या खुळाने थेट तुरुंगात पोहोचवलं घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर मगंळवारी रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. या सामूहिक आत्महत्येनंतर सर्वांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अशी कोणती परिस्थिती आली होती, ज्यामुळे या तिन्ही जणींना आत्महत्या करावी लागली, अशा प्रश्न यानिमित्ताने येथील स्थानिकांना पडला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात