मुंबई, 22 ऑगस्ट : भाद्रपद शु. 04 गणेशचतुर्थी आजपासून सुरू झाली आहे. वर्षभर बाप्पाची वाट पाहणारे सगळेच जण आज त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करत आहे. या उत्सवावर मात्र कोरोनाचं सावट असलं तरीही घरगुती पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग पाळून गणपती बाप्पाचं घरी आनंदात स्वागत केलं जात आहे. यंदा मात्र अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम कमी झाल्याचं प्रथमच पाहायला मिळत आहे.
अनेक गावांनी कोरोनाच्या महासंकटात एक गाव एक गणपती ही पद्धत अवलंबली आहे. तर अनेक गणेश मंडळांनी या महासंकटात गरजवंतांना मदत करून त्यांची विघ्न दूर केली आहेत.
मुंबईत सिद्धीविनायक मंदिर न्यास यंदा सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणार आहे. राज्य सरकारने अजून मंदिरांना उघडण्याचे आदेश दिले नसल्यामुळे राज्यातील सर्व मदिरं बंद आहेत. पण मंदिरातील पारंपारीक उत्सव मर्यादीत भक्तांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा सिद्धीविनायक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र सर्व भाविकांसाठी ऑनलाईन गणेश दर्शनाची व्यवस्था मंदिर न्यासाकडून करण्यात आली आहे.
हे वाचा-Ganesh Chaturthi 2020 : तुमचा बाप्पाबरोबरचा Selfie पाठवा आणि मिळवा बक्षिसं
लालबाग, परळ आणि गिरगाव परिसरातही राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही बाप्पाच्या येण्याचा आनंद कमी झाला नाही. तितक्याच उत्साहात राज्य सरकारच्या नियमांचं पालन करून घरोघरी गणरायाचं आगमन झालं.
संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. या कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. हे जागतिक विघ्नं दूर करण्यासाठी सर्वचजण गणरायाला साकडं घालत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus