जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / संतापजनक! नराधम बापाचा पाय घसरला, अल्पवयीन लेकीला गेले दिवस

संतापजनक! नराधम बापाचा पाय घसरला, अल्पवयीन लेकीला गेले दिवस

व्यसनाच्या आहारी गेलेल्या मजुराने आपली 15 वर्षांची मुलगी वयात येतेय बघून तिच्यावरच झडप घातली.

व्यसनाच्या आहारी गेलेल्या मजुराने आपली 15 वर्षांची मुलगी वयात येतेय बघून तिच्यावरच झडप घातली.

बदनामी थांबण्यासाठी नराधमाने पीडितेला पोलिसांत तक्रार करायला सांगितलं. गावातल्या दोन मुलांवर बलात्काराचा आरोप लाव नाहीतर…अशी धमकी त्याने दिली.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 22 जून : मुलगी ही मनाने आईपेक्षा वडिलांच्या जास्त जवळ असते, असं म्हणतात. बाप-लेकीचं नातं हे सर्वात सुंदर नातं मानलं जातं. याच नात्यावर ओरखडे आणणारी अतिशय संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून समोर आली आहे. बापाने आपल्या अल्पवयीन लेकीवर ती गरोदर होईपर्यंत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या नराधम बापाला पोलिसांनी तुरुंगात धाडलं आहे. उमरगा तालुक्यातील एका गावात 45 वर्षीय मजूर त्याची पत्नी आणि 15 वर्षीय मुलीसोबत राहत होता. हे दोघं पती-पत्नी मजुरी करून आपलं पोट भरत असत. साधारणतः आपली मुलगी वयात येत असताना प्रत्येक आई-वडिलांना तिच्याकडे कोणी वाईट नजरेने तर बघणार नाही ना, याची काळजी वाटत असते. परंतु या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मजुराने आपली 15 वर्षांची मुलगी वयात येतेय बघून तिच्यावरच झडप घातली. तीन महिने सलग त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि याबाबत कोणाला सांगितलंस तर मी काय करेन बघ, अशी धमकीच तिला दिला. त्यामुळे पीडिता निमूटपणे बापाचे अत्याचार सहन करत होती.

News18लोकमत
News18लोकमत

एका दिवशी पोटात दुखू लागल्याने पीडितेला दवाखान्यात नेलं असता ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचं कळलं. ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि पीडितेसह तिच्या आई-बापाला लोक हसू लागले. ही बदनामी थांबण्यासाठी नराधमाने पीडितेला पोलिसांत तक्रार करायला सांगितलं. गावातल्या दोन मुलांवर बलात्काराचा आरोप लाव नाहीतर…अशी धमकी त्याने पुन्हा तिला दिली. त्यानंतर पीडितेने त्याच्या सांगण्यावरून पोलिसांत तक्रार दाखल केली. Crime News: पत्नीला रात्री बेशुद्ध करायचा; मग अनोळखी पुरुषांना घरी बोलवायचं अन्..अखेर 10 वर्षांनी खुलासा पोलिसांना मात्र ही तक्रार वाचताच ती खोटी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन पीडितेची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात