पिंपरी चिंचवड, 28 जुलै: सोशल मीडियात बंदुकीसह फोटो क्लिक (Photo with gun) करुन अपलोड करणं पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडा विरोधी पथकाने धडक कारवाई करत एका बंदुकबाज तरुणांना अटक केली आहे. आरशान शेख असं अटक केलेल्या तरुणाचं या नावं असून तो देशी बनावटीचं पिस्टल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरशान शेख हा देशी बनावटीचं पिस्टल बाळगत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आरोपी आरशान वर लक्ष ठेवले आणि सोशल मीडियावर त्याने बंदुकी सोबत टाकलेले व्हिडीओ त्यांना दिसले. हा प्रकार दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने केलेले कृत्य होतं. मात्र आरशानने व्हिडीओमध्ये वापरलेले पिस्तूल खरं होतं की खोटं याची शहनिशा करणं गरजेच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडील पिस्टल जप्त केलं. सोशल मीडियात दहशत पसरवणारे 13 भाई गजाआड, पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई जप्त केलेलं पिस्तुल खरं असून आरोपी तो विना परवाना वापरत असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यानंतर आता त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट नुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आधीही धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर आपले व्हिडीओ टाकत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मात्र त्या नंतर ही हे प्रकार सुरूच असल्याने नागरिकांनी सतर्क राहून त्या बाबत पोलिसांना माहिती कळविण्याचं अवाहन गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी केलं आहे. आरशान शाकीर शेख याच्यासोबत उमेर जाकिर शेख यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडे असलेल्या दुचाकीच्या डिकीत देशी बनावटीचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.