मराठी बातम्या /बातम्या /देश /मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणाच्या प्रेमापुढे गाव नरमलं, गावकऱ्यांनीच धुमधडाक्यात लावून दिलं लग्न!

मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणाच्या प्रेमापुढे गाव नरमलं, गावकऱ्यांनीच धुमधडाक्यात लावून दिलं लग्न!

विवाहसोहळा

विवाहसोहळा

हिंदू धर्मातील मुलगा आणि मुस्लीम धर्माच्या मुलीमध्य्ये प्रेमसंबंध होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी

छपरा, 21 मार्च : प्रेम जर खरे असेल तर कोणत्याही जाती-धर्माच्या भिंती त्याला रोखू शकत नाहीत, असे म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार बिहारच्या छपरामध्ये पाहायला मिळाला आहे. याठिकाणी एक मुस्लिम मुलगी हिंदू मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यांना लग्न करायचे होते आणि शेवटी सर्वांनी या लग्नाला मान्यता दिली. या प्रेमाला ग्रामपंचायतीने सामाजिक मान्यता देऊन गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

यापूर्वी दोघेही गावातून पळून गेले होते. यानंतर दोघेही फरार झाल्यामुळे गावात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्याने लोकांना दोघांच्या भावना समजल्या. मग लग्न करायचं ठरवलं आणि दोघांना बोलावून त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. छपराच्या गरखामध्ये सोमवारी मोठ्या संख्येने हे लग्न उत्साहात लावण्यात आले. यावेळी हे लग्न बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच या नव्या जोडप्याला सर्वांनीच यावेळी शुभेच्छा दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, रिना प्रसाद यांचा मुलगा राजा बाबू आणि साबीर अली शाह यांची मुलगी निशा या दोघांचा शाळेत असतानाच एकमेकांवर जीव जडला होता. दरम्यान, गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध वाढले होते. दरम्यान, एके दिवशी संधी मिळताच दोघेही गावातून पळून गेले. यावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. मात्र, नंतर ग्रामपंचायतीने परिस्थिती हाताळून आपसात संवाद साधून दोघांचे प्रेमाच्या मान्यता देण्याचा निर्णय घेतला.

वरण-भात, रसगुल्ला...... याठिकाणी गरजूंना मिळते फक्त 5 रुपयात जेवण VIDEO

यानंतर मुलीने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचे मान्य केले आणि त्यानंतर गारख्यात हा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान, या लग्नासाठी गावातील लोक खूप उत्सुक दिसत होते. दोघांची संमती असेल तर ग्रामपंचायतीला काहीच अडचण नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या लग्नाला राजा बाबूची आई चंदा देवीही उपस्थित होत्या. या लग्नामुळे आपण खूश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी ग्रामपंचायतीचे कौतुकही केले.

First published:
top videos

    Tags: Bihar, Love story, Marriage