चित्रकूट, 14 मार्च : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात नातेवाइकांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा प्रियकरासोबतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर रागाच्या भरात एका बापाने आपल्या बंदुकीने आपल्या मुलीवर गोळी झाडली. यादरम्यान बचावासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही गोळी लागली. या घटनेत आई आणि मुलगी या दोघींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही घटना बहिलपुरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिमरदहा गावातील आहे. येथे नंद किशोर त्रिपाठी नावाच्या व्यक्तीची मुलगी खुशी त्रिपाठी तिच्या आजोबांच्या मराचंद्र गावात राहत होती. तेथे तिचे पंकज यादव नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. खुशी त्रिपाठी होळीनिमित्त तिच्या आई-वडिलांच्या घरी आली होती. यादरम्यान नंद किशोर त्रिपाठी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांची मुलगी खुशी त्रिपाठीचा एका तरुणासोबतचा व्हिडिओ पाहिला.
त्यानंतर, रागाच्या भरात त्याने आपली परवाना असलेली बंदूक खुशीकडे दाखवली आणि तो तिच्यावर गोळी झाडणार होता. हे पाहून त्याची पत्नी आणि खुशीची आई मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली. यामध्ये सुटलेली पहिली गोळी महिलेला लागली तर दुसरी गोळी खुशी त्रिपाठीला लागली.
शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य
गोळीबारात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. लोकांनी घाईघाईने रक्ताने माखलेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर या घटनेनंतर आरोपी नंदकिशोर त्रिपाठी फरार झाला आहे.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत -
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चक्रपाणी त्रिपाठी सांगतात की, कौटुंबिक कलहामुळे नंद किशोर त्रिपाठी यांनी पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडल्या आणि दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आरोपी पित्याला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहिल्याची चर्चाही तपासली जात आहे. जे काही पुरावे समोर येतील त्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Daughter, Instagram, Local18, Murder, Uttar pradesh