मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य

शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य

महिलेवर बलात्कार

महिलेवर बलात्कार

महिला शौचालयाला गेली असता, नराधमाने डाव साधत भयानक कृत्य केलं.

  • Local18
  • Last Updated :
  • Dhaulpur, India

हरिवीर शर्मा, प्रतिनिधी

धौलपूर, 13 मार्च : देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घडना समोर आली आहे. धोलपूर जिल्ह्यातील सांपौ पोलीस स्टेशन परिसरात 22 वर्षीय महिलेसोबत अत्याचार केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

महिलेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचे जबाब घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिस स्टेशनचे एएसआय फतेह सिंह यांनी सांगितले की, शनिवारी एक 22 वर्षीय महिला पोलिस स्टेशन परिसरात शौचासाठी शेतात गेली होती. शेजारच्या गावातील तरुणांनी महिलेला शेतात ओढून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेने आरडाओरडा सुरू केल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे जबाब घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी गावातून पळून गेला होता. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.

होळीनंतर घरातून परतत होती स्टाफ नर्स, जुना वाद अन् रस्त्यात घडलं भयानक

महिलेला एकटी पाहून साधला डाव -

पीडित महिला गावाबाहेरील शेतात शौचालयाला गेली होती. यावेळी आरोपीही छुप्या पद्धतीने मागे गेला. महिला शेतात शिरताच आरोपीने तिला पकडले. तसेच आरोपी महिलेला शेताच्या मध्यभागी घेऊन गेला आणि याठिकाणी त्याने तिच्यावर दुष्कर्म केले. नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा गावातीलच आहे. जो बराच वेळ त्या महिलेवर वाईट नजर ठेवून होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Local18, Rape