लखनऊ 28 मे : मुलीसाठी तिचे वडील सर्वात मोठे हिरो असतात. पण, दीड वर्षाच्या मुलीची तिच्या वडिलांनीच गळा आवळून हत्या केली तर? उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका बापाने दारूच्या नशेत आपल्या दीड वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. मुलीचा दोष एवढाच होता की ती रडली, कारण तिचे वडील आईला मारत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण नोएडातील जेवर शहराशी संबंधित आहे. येथे एका पित्याने हे कृत्य केलं आहे. दीपक असं आरोपीचं नाव आहे. त्याने दारू पिऊन घरी परतल्यानंतर पत्नीशी भांडण सुरू केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आरोपीची पत्नी गायत्री जीव वाचवून माहेरी गेली, तर तिची दीड वर्षाची मुलगी रडायला लागली. जुना वाद वाढदिवसाच्या पार्टीत विकोपाला; भररस्त्यात तरुणावर तलवारीने सपासप वार अन.. मुलीला रडताना पाहून या आरोपीचा राग अनावर झाला. त्याला काहीच सुचलं नाही आणि त्याने थेट आपल्या मुलीचा गळाच दाबला. गळा दाबताच मुलीचा आवाज बंद झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पत्नीने पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. इकडे आरोपीची आईही मुलावर खूप नाराज होती, तिनेही न्यायाची याचना केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार कोतवाली प्रभारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीसोबतच तो निष्पाप मुलांनाही मारहाण करत असतो. त्याला दारूचं व्यसन आहे. त्याचं आई-वडिलांशीही भांडण होत असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.