नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 27 मे : मित्राचा वाढदिवस साजरा करीत असतानाच जुन्या वादातून झालेल्या शाब्दिक वादाचा अंत अखेर जिवावर बेतला. वर्धा ते नागपूर रस्त्यावर नालवाडी परिसरातील पेट्रोलपंपासमोर कार आडवी करीत दारुविक्रेत्याने तरुणावर तलवारीने सपासप वार करुन त्याची निर्घूण हत्या केली. ही घटना मध्यरात्री दीड ते 2 वाजताच्या दरम्यान घडली. राहुल विरुळकर (वय 32, रा. संत ज्ञानेश्वर नगर म्हसाळा), असे मृताचे नाव आहे. तर दिनेश अशोक येंडाळे (रा. नालवाडी आणि चिंटू शर्मा रा. शास्त्री चौक अशी आरोपींची नावे आहे. काय आहे प्रकरण? इम्रान नामक तरुणाचा वाढदिवस असल्याने त्याने केळझर जवळील हायवे लगतच्या एका धाब्यावर ‘सेलिब्रेशन’ ठेवले होते. त्या पार्टित आरोपी दिनेश येंडाळे, चिंटू शर्मा आणि मृतक राहुल विरुळकर हे देखील सहभागी झाले होते. आरोपी दिनेश आणि मृतक राहुल यांच्यात जूना वाद होता. पार्टीत पुन्हा दोघांत शाब्दिक वाद झाला. राहुल पार्टीतून निघून त्याच्या मित्रांसह कारने वर्धा येथे येत होता. दरम्यान तेवढ्यातच मागाहून दिनेश येंडाळे आणि चिंटू शर्मा हे कारने भरधाव आले आणि ओव्हरटेक करुन कार थेट राहुलच्या कारसमोर आडवी लावली. वाचा - ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर पुण्यात लव जिल्हादची केस समोर? चार वर्षानंतर मुलगी दिनेश तलवार घेत कारबाहेर निघाला आणि शिवीगाळ करू लागला. राहुल कारखाली उतरला असता दिनेश व चिंटूने राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने सपासप वार करीत त्याची निघृर्ण हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या राहुलला त्याच्या मित्रांनी लगेच सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. राहुलची पत्नी स्मिता हिने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिनेश येंडाळे व चिंटू शर्मा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.