मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /"..म्हणे मी दिसायला सुंदर नाही", 25 वर्षांच्या डॉक्टर तरुणीचा भयानक निर्णय

"..म्हणे मी दिसायला सुंदर नाही", 25 वर्षांच्या डॉक्टर तरुणीचा भयानक निर्णय

फाईल फोटो

फाईल फोटो

25 वर्षांच्या डॉक्टर तरुणीने भयानक निर्णय घेतला.

  • Local18
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

झाबुआ, 12 मार्च : देशात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सुशिक्षित तरुण तरुणींचाही यामध्ये समावेश आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. इतकेच नव्हे तर सुसाईडमध्ये आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

मध्य प्रदेशातील झाबुआ येथे गुरुवारी रात्री डॉक्टर तरुणी निशा भयाल हिने गळफास लावून आत्महत्या केली. तर खोलीतून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये निशाने लिहिले होते की, 'मी दिसायला सुंदर नाही. मी जे काही काम करते, ते चुकून जाते. खूप तणावात आहे. आयुष्यात काहीच चांगले घडत नाही आहे. आत्महत्या करायची इच्छा होत आहे."

होळी साजरी करून आली होती निशा -

झाबुआ येथील मेघनगर नाका येथे 25 वर्षीय तरुणी डॉक्टर निशा भायल हिने गुरुवारी रात्री घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. निशा येथे भाड्याच्या घरात राहायची. निशाची नियुक्ती झाबुआ जिल्हा रुग्णालयात 6-8 महिन्यांपूर्वी बाँडवर झाली होती. होळीची सुट्टी साजरी करून निशा गुरुवारी सकाळी पेटलावदहून झाबुआला परतली.

दिवसभराची ड्युटी करून निशा संध्याकाळी साडेपाच वाजता रूमवर आली. यानंतर तिने दूधही घेतले. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होते. मात्र, रात्री आठच्या सुमारास खोलीचा दरवाजा उघडला नाही.

फोन उचलत नसल्याने नातेवाईक होते चिंतेत -

रात्री नऊ वाजता निशाने घरच्यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या निशाची मैत्रीण डॉ. निशा मुलेवा हिचे कॉल केला. यानंतर डॉ. निशाने दार वाजवले आणि शेजाऱ्यांनाही बोलावले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने घरमालक मयंक राठोड यांनी खिडकी तोडून आत पाहिले असता निशा फासावर लटकलेली होती.

भयानक, पत्नीला तिहेरी तलाक देऊन 'त्याने' केलं ट्रान्सजेंडरशी लग्न, नेमकं काय घडलं?

घरमालकाने पोलिसांना कळवले आणि शेजारच्या लोकांनी खिडकीची काच फोडून आत जाऊन दरवाजा उघडला. यानंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पेटलावद येथून ते झाबुआ येथे पोहोचले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. सुशिक्षित तरुणीच्या आत्महत्येच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Girl death, Local18, Madhya pradesh, Woman doctor