मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चीनचा नवा कांगावा; म्हणे,अमेरिकेतील लॉबस्टर, सौदी अरेबियातील कोळंबी Coronaला कारणीभूत

चीनचा नवा कांगावा; म्हणे,अमेरिकेतील लॉबस्टर, सौदी अरेबियातील कोळंबी Coronaला कारणीभूत

brazil fish market

brazil fish market

ब्राझीलमधील गोमांस, सौदी अरेबियाची कोळंबी आणि अमेरिकेचे लॉबस्टर-पोर्क मीट हे कोरोना विषाणू (Corona)पसरण्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

  बीजिंग, 1नोव्हेंबर:  जगभरातील अनेक देश सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) सामना करत आहेत. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील (China) वुहान शहरात आढळून आला होता. चीनने कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरवला असा आरोप अमेरिकेसह (America) अनेक देशांनी केला आहे. अर्थात याचे काही पुरावेदेखील मिळाले आहेत. मात्र चीननं सातत्यानं हे आरोप नाकारले आहेत. जगभरात कोरोना पसरवण्याबाबतची बदनामी टाळण्यासाठी आता चीनने नवे डावपेच सुरू केले आहेत.

  ब्राझिलियन गोमांस (बीफ), सौदी अरेबियातील कोळंबी मासा आणि अमेरिकेतील मेनेमधील लॉबस्टर हा खेकडा हे कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी कारणीभूत आहेत, हा सिद्धांत मांडण्यासाठी चीनमधील लाखो अकाउंटसचा वापर केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  जागतिक थिंक टॅंक पॉलिसी रिसर्च ग्रुपच्या मार्सेल श्लीब्स चीनच्या या प्रचाराबाबत संशोधन करत असून, चीनच्या या अजेंडाच्या समर्थकांच्या शेकडो अकाउंटसचा अभ्यास श्लीब्स यांनी केला आहे. ``चीनच्या अजेंडाचं समर्थन करणाऱ्या समर्थकांचे शेकडो अकाउंटस आढळून आले असून, या अकाउंटसच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसच्या प्रसारास कारणीभूत होण्यासाठी शीत मांस निर्यात करण्याच्या सिध्दांताचा प्रचार केला जात आहे``, असं त्यांनी सांगितलं.

  जागतिक थिंक टॅंकनं दिलेल्या माहितीनुसार, श्लीब्स यांनी सुमारे 18 महिने या अकाउंटसविषयी अभ्यास केला. त्यात कोलकाता (Kolkata) येथील दुतावासात कार्यरत एका चिनी राजदुतानं लॉबस्टार किंवा पोर्कबाबतचा सिध्दांत शेअर करणं सुरू केल्याचं आढळून आलं. अहवालानुसार, झा लियोऊ यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये हा सिध्दांत पोस्ट केला होता, मात्र आता तो वेगानं व्हायरल होत आहे. मात्र, लॉबस्टर पुरवठादार आणि मेनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (Centers For Disease Control) या दोघांनी हे दावे स्पष्टपणे नाकारले आहेत, परंतु, चीनवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही.

  मागील काही दिवसांपासून रशिया, ब्रिटन, सिंगापूर, युक्रेन आणि पूर्व युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन (Britain) आणि रशियामध्ये (Russia) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटनमध्ये 17 जुलैनंतर प्रथमच 50,000 पेक्षा अधिक रुग्ण संख्या नोंदली गेली आहे. युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या ताज्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हॅरियंट (Delta Variant) अत्यंत घातक सिद्ध झाला आहे. मात्र डेल्टाचा उपप्रकार असलेल्या AY.4.2 चे रुग्ण सध्या वेगाने वाढत आहे.

  सिंगापूरमध्ये गुरुवारी 3439 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या विविध रुग्णालयांमध्ये 1613 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 346 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासत आहे. चीनमध्ये देखील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचे तसेच शेकडो विमान उड्डाणं रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा नव्याने झालेला प्रकोप पाहता चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग (Testing) सुरू करण्यात आल्या आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Brazil, China, Corona, Corona spread, Coronavirus cases, Fish