फरीदाबाद, 16 ऑगस्ट : क्राइम ब्रान्चच्या डीएलएफ टीमने 18 महिन्याच्या बाळाच्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने अवघ्या 50 रुपयांसाठी एका बाळाची हत्या केली. आरोपीने पाण्याच्या टाकीत बुडवून बाळाची हत्या (Baby killed) केली. या प्रकरणात नरेश बिन्नू याला अटक करण्यात आली आहे. 22 वर्षांच्या आरोपीला नशेचं व्यसन होतं. पोलिसांनी सांगितलं की, बाळाच्या वडिलांसोबत झालेल्या वादानंतर आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं. (Faridabad Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट 2021 रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा शान मोहम्मद याच्या शेजारी राहत होता. त्याचं मोहम्मदसोबत भांडण झालं होतं. ज्यानंतर तो मोहम्मदचा सूड उगविण्याचं कारस्थान आखत होता. 5 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी त्याला मोहम्मद याचा मुलगा खेळताना दिसला. संधी साधून त्याने त्याचं अपहरण केलं आणि आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्यानंतर टेरेस घेऊन गेला आणि पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने पाण्याची टाकी तारेने बांधून घेतली. बराच वेळ बाळ दिसलं नाही म्हणून कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. शेवटी बाळाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. पोलिसांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. (Faridabad Crime News : 18 month old baby killed in Rs 50 dispute Murder by drowning in a water tank mhmg)
हे ही वाचा-पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहिला; चायनीज मांज्यामुळे बुलेटस्वाराचा मृत्यू
काय झालं होतं त्या दिवशी
आरोपी मोहम्मद याच्या शेजारीच राहत होता. शिवाय नेहमीच दोघांमध्ये भांडण होत असे. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपीने मोहम्मदच्या 8 वर्षांच्या मुलीकडून 50 रुपये खेचून घेतले होते. ज्यानंतर मोहम्मदसोबत त्याचं भांडण झालं. त्यानंतर तो मोहम्मदसोबत सूड उगविण्याचं प्लानिंग करू लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder